*दिल्लीत शेतकरी आंदोलनात मु्त्युमुखी पडलेल्या शेतकर्यांच्या परिवारास सांत्वन*
*मा.मंत्री सुनील केदारांनी घेतली भेट*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
नागपुर – शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात जिथे संपुर्ण देशातील शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. त्याच धर्तीवर मागील ७० दिवसापासून दिल्ली येथे देशातील शेतकरी व त्यांचे कुटुंब आंदोलनात बसले आहे,यातच महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अंबाबरी येथील स्व.सीताबाई रामदास तडवी या सुद्धा शेतकरी आंदोलनात दिल्ली येथे गेल्या असता मृत्युमुखी पडल्या. आज त्यांच्या अंबाबारी जिल्हा नंदुरबार येथे सांत्वना भेट दिली.शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता गेलेल्या स्व सीताबाई तडवी यांच्या कुटुंबियांना बकरी पालन केंद्र (गोट फार्म) देण्यात येईल. तसेच महाविकास आघाडी शासन म्हणून सदैव आपल्या पाठीशी राहील असे आश्वासीत केले.