*सावनेर येथे केद्र सरकार शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात चक्काजाम* *शेतकरी शेतमजूर केन्द्र शासनाच्या विरोधात रस्त्यावर टायर जाळून व घोषणाबाजी करत नोंदवला विरोध*

*सावनेर येथे केद्र सरकार शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात चक्काजाम*

*शेतकरी शेतमजूर केन्द्र शासनाच्या विरोधात रस्त्यावर टायर जाळून व घोषणाबाजी करत नोंदवला विरोध*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरसिया

सावनेर –केन्द्र शासनाने पारीत केलेल्या शेतकरी वीरोधी कायद्याच्या विरोधात काँग्रेस व अन्य शेतकरी प्रेमी संस्थांनी पुढाकार घेत दि.6 फेब्रुवारी 2021 रोजी क्षेत्राचे आमदार व राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील बाबू केदार यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर कुंभारे उपाध्यक्ष जिल्हापरिषद नागपूर,सभापती पंचायत समीती सावनेर,पंचायत समिती सदस्य गोविंदा ठाकरे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गांधी पुतळा चौक येथे रस्तारोको आंदोलन करुण शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा तिव्र निषेध नोदविला.

*केद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात तीव्र निदर्शन करत हजारोंच्या संख्येत महिला पुरुष कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शवत जवळपास दोनतास रस्त्यावर ठीय्या आंदोलन करत वाहतूक थांबवली सोबतच रस्त्यावर टायर जाळून व केन्द्र शासनाने शेतकरी विषयी धोरण संपुष्टात आनले नाही तर यापुढे तिव्र आंदोलनाची चेतावणी याप्रसंगी देण्यात आली*

*दि.6 फेब्रुवारी ला सकाळी 11-00 वाजता गांधी पुतळा या रस्तारोको आंदोलनात सावनेर तालुक्यातील सर्व काँग्रेस,युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,शेतकरी व शेतमजूर बांधव आपले ट्रँक्टर,बैलगाड्या व मिळेल त्या साधनाने दुपारी 11-00 वाजेपासुन पोहचू लागले व बघता बघता एकच गर्दी होऊण रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोखण्यात आला*

*याप्रसंगी नागपुर जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे,जिल्हापरिषद सदस्य ज्योतीताई सिरसकर,पंचायत समिती सावनेरच्या सभापती सौ.शींदे आदिंने मार्गदर्शन करत शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात रोष व्यक्त केला*

*तर राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवा कल्याण मंत्री ना.सुनील केदार यांनी आपल्या संबोधनातुन केन्द्र शासनाचा खरपूस समाचार घेत म्हटले की हे सरकार अडाणी व अंबानीचे सरकार आहे.यांना गोरगरीब शेतकरी,शेतमजूर, सुशिक्षित अशिक्षित बेरोजगारांच्या समस्या दिसत नाही दिसते ते फक्त भांडवलदार.मागील 70 दिवसापासून लाखो देशाचे पोशिंदे कडाक्याच्या थंडीत सहपरिवार उपोषणावर बसले आहे.त्यांना भेटन्याची वेळा पंतप्रधानांजवळ नाही उलट आंदोलकांना पांगवण्यासाठी थंडीत त्यांच्यावर पाण्याचा मारा करुण त्यांना हाकलुन लावण्यासाठी ताकत लावत आहे.हे हिटलरच्या हिटलरशाहीलाही मागे टाकून देशाला भांडवलदारांच्या घष्यात टाकत असल्याचा घणघणीत आरोप आपल्यासंबोधनातुन केला*

*या रस्तारोको आंदोलनाच्या यशस्वीते करीता तालुका काँग्रेस अध्यक्ष सतिष लेकुरवाळे, सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश खंगारे, शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल,शहर काँग्रेसचे सचिव विजय बसवार, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सियीया,युवा नेते मनोज बसवार, नगरसेवक सुनिल चाफेकर, निलेश पटे,दिपक बसवार,माजी नगरसेवक गोपाल घटे,अश्विन कारोकार,चंदु कामदार, घनश्याम तुर्के,श्याम चव्हाण आदिंनी परिश्रम घेतले*

*आयोजनाचे संचालन रामभाऊ उमाटे यांनी तर राजेश खंगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले*

Check Also

*आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत फाँसी दो।*

🔊 Listen to this *आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत …