**चिखलानी माखलेलेल्या रस्त्यावर .स्वखर्चाने बांधकाम..*
*सटवा माता मंदिर परिसरातील नागरीकांचा पुढाकार*
*लोक वर्गणी करुण केली रस्त्याची डागडुजी*
*किशोर ढुंढेले सावनेर...*
*सावनेर ः बस स्थानक लागत असलेल्या सटवा माता मंदिर प्रभाग क्र.5 परिसराला मुख्य मार्गाने जोडणार्या रस्त्यावर मागील दहा बारा वर्षापासून नगर प्रशासनाची दु्ष्ट लागल्याने परिसरातील नागरिकांना सदर मार्गावरिल खड्डे,चिखल व साचलेल्या पाण्याच्या डबके तुडवत रहदारी करावी लागत असल्यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र रोष निर्माण होते*
*बस स्थानक परिसरातील सटवा माता मंदिर प्रभाग क्र.5 ला मुख्य मार्गाशी जोडणारा सदर मार्ग नेहमीच चर्चेचा विषय राहला असुन हलक्याश्या पावसात सदर रस्ता चिखल व खड्ड्याने रहदारी करण्या लायक राहत नसून अश्यात परिसरातील नागरिक,महिला,विद्यार्थी वर्गास चिखल व खड्डे भरलेल्या मार्गावर पडुन अनेकांना आपले हात पाय मोडत रहदारी करावयास बाध्य व्हावे लागत आहे.या रस्त्या विषयक अनेक तोंडी व लेखी सुचना नगर प्रशासनास देऊण ही नगर प्रशासनास पाझर फुटत नाही व फुटला तरी डाग डुजी करुण आपल्या कर्तव्य पुर्तते पलीकडे काही होत नसल्याने नागरिकांनी आशा करावी तरी कुणीशी असा यक्ष प्रश्न निर्माण होणे अपेक्षित होते.*
*अनेकदा तोंडी व लेखी निवदने तसेच खड्यात साचलेल्या पाण्यात सांकेतीक वुक्षारोपन तसेच निदर्शेने करुण सुद्धा नगर प्रशासनास जाग येत नसल्याचे संकेत दीसू लागताच व मागील कीत्येक दिवसापासून सतत पावसाची रीपरीप सुरु असल्याने सदर मार्ग अजूनच दयनिय झालेल्याने प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी व काही दिवसावर येऊन ठेपलेल्या नवरात्री उत्सव व सटवा माता मंदिरात हजारो हजार भाविकांची गर्दी व प्रभागातील नागरिकांना होत असलेला त्रास बधुन स्वःखर्चांने सदर रस्ता बाधन्याचे ठरवीले व जवळपास पन्नास हजार रुपये लोकवर्गणीतून गोळा करुण अनेक ट्रक मुरुम टाकून जेसीबी नी रीतसर पसरवून त्याला रोलर व्दारे चांगल्या प्रकारे दाबून चालन्या योग्य रस्ता नागरिकांना उपलब्ध करुण दिल्या बद्दल त्यांचे या प्रशंसनीय कार्याचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.*
*याप्रसंगी विनीत पाटील,अनिल करारे,बंटी आसोलकर,अरुण कळंबे,चंद्रशेखर खेकारे,अजय आकुलवार,मोनेश बागडे,रोशन घ्यार,रुपेश कमाले,भोजराज गाहाने,पंकज ढाले,ताराचंद बंभुरे,अक्षय सेलुकर,देवानंद ठाकुर,पवन राऊत,संकेत गमे,गणेश लांडे,वैभव पेठे,राजेश चव्हाण,प्रतिक लाटकर,फारुक शाह,शमीम खान,किशोर भुते,गोलु घोडसे,दिपक गव्हाने सह अनेक युवा उपस्थित मीत्र मंडळी ने परिश्रम घेतले…*