*सावनेर कळमेश्वर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांकरिता भव्य रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन*
*पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदारांचा पुढाकाराने युवक काँग्रेस व सुनिल केदार मित्र परिवाराचे यशस्वी आयोजन*
*हजारो बेरोजगार युवक युवतींचा सहभाग रोजगार उपलब्ध होण्याच्या आशा पुलकित*
मुख्य संपादक – किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरसिया
सावनेरः आपल्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील सुशिक्षित अशिक्षित युवक युवतींना योग्य रोजगार उपलब्ध होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने सतत प्रयत्नशील असनारे क्षेत्राचे आमदार व राज्य शासनात पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकाराने दि.07 फेब्रुवारी रोज रविवार ला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केन्द्र सावनेर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यात
वेदांता -चाकन
इलेक्ट्रो मेक – प्रिंगुट
रेडिएंट प्राइवेट लिमिटेड -चंदननगर
सिंटेरकॉम प्राइवेट लिमिटेड – तलेगांव
एक्ससाइड बैटरी – नगर
महले फिल्टर्स (प्रिंगुट) – प्रिंगुट
सुप्रीम प्राइवेट लिमिटेड – खने फट (तलेगांव)
महले फिल्टर्स – चाकन
अद्विक प्राइवेट लिमिटेड – चाकन
सिएट – बुटिबोरी
एमके टूल्स – हिंगना( एम आई डी सी )
पिक्स ट्रांसमिशन – हिंगना( एम आई डी सी )
पी एम आय – मिहान
इत्यादी ख्यातीप्राप्त कंपन्यामधे रोजगाराची संधी उपलब्ध होणार असुन त्याकरिता पूर्वतयारी विषयक माहीती कंपनीचे प्रतिनिधी तसेच बेरोजगार युकक युवतींना रोजगार मीळावा याकरीता धडपड करणाऱ्या युवा फाऊंडेशन नागपुर चे अध्यक्ष कु्णाल पडोळे तसेच यशस्वी फाऊंडेशन पुणे चे अध्यक्ष आशीष अतकरी आदिंनी उपस्थित हजारोच्या वरील बेरोजगार युवक युवतींना मार्गदर्शन केले.
*दि.7 फेब्रुवारी ला संपन्न सदर शिबीरास जिल्हा परिषद नागपुर चे उपसभापती मनोहर कुंभारे,सावने शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल,जिल्हापरिषद सदस्य ज्योतीताई सिरसकर, सावनेर पंचायत समितीच्या सभापती अरुणा शेंडे, कळमेश्वर पंचायत समिती सभापती दिदा भिंगारे, ना.जी.युवक काँग्रेसचे अध्य राहुल सिरीया,सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश खंगारे,पंचायत समिती सदस्य गोविंदा ठाकरे, नगरसेवक सुनील चाफेकर,दिपक बसवार,निलेश पटे,व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार आदिनी आयोजीत मेळाव्यास भेट देऊण बेरोजगार युवक युवतीचे उत्साहवर्धन केले*
*आयोजित सदर मेळाव्यात ग्रामीण क्षेत्रातील उपस्थित युवक युवतींकरिता सुनील केदार मित्र परिवारातर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली सदर आयोजनाच्या यशस्वीते करिता विनीत पाटील, भरत धुनडुळे, देवा ठाकुर, प्रवीण झाडे,चंदु कामदार,अश्वीन कारोकार,मोहन कमाले,प्रफुल सुपारे, राहुल ढाँगोडे , अमोल केने, आकाश सोनी,आदिंनी परिश्रम घेतले*