*एटीएम कार्ड ची अदला – बदल करून दहा हजार रूपयांची केली फसवणुक*
*कन्हान येथील घटना , कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील शोध केला सुरु*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया कन्हान शाखेच्या एटीएम मध्ये मदन विश्वनाथ सिंग पैसे काढण्यास गेले असता अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्ड ची अदला – बदल करून फिर्यादी च्या खात्यातील दहा हजार रूपये काढुन फसवणुक केल्याने फिर्यादी ने कन्हान पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरूध्द तक्रार टाकुन कन्हान पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.
मंगळवार दिनांक.२ फेब्रुवारी ला रात्री ८ वाजता च्या सुमारास फिर्यादी मदन विश्वनाथ सिंग वय ७० वर्ष राहणार प्रभाग क्रमांक ६ पिपरी हे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कन्हान च्या एटीएम मध्ये पैसे काढण्यास गेले असता पैसे निघाले नसल्याने मागेच उभे असलेल्या एका व्यक्ती ने एटीएम कार्ड काढुन देतांना कार्डची अदला- बदल करून फिर्यादी च्या खात्यातील दहा हजार रूपये काढल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दिल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरूध्द कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करून पोहवा खुशाल रामटेके यांनी पुढील तपास सुरू केला असुन आरोपीचा शोध घेत आहे .