*कोंढाळी येथे अद्यावत क्रीडा संकुला करीता हालचाली सुरू* *प्रशासकिय मंजूरी व क्रीडाविकास निधी मंजूरी करिता संबधित विभागाकडे प्रस्ताव पाठविला*

*कोंढाळी येथे अद्यावत क्रीडा संकुला करीता हालचाली सुरू*


*प्रशासकिय मंजूरी व क्रीडाविकास निधी मंजूरी करिता संबधित विभागाकडे प्रस्ताव पाठविला*

काटोल प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे

काटोल – लगभग 20हजार लोकसंख्या असलेल्या तसेच राष्ट्रिय व अंतर्राष्ट्रीय खेळात प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे सरावा करीता खेळाचे मैदान नाही, येथील खेळाडू व कोंढाळी ग्रामपंचायत चे मागणी वरून स्थानिक आमदार व राज्याचे गृहमंत्री नामदार अनिलबाबू देशमुख यांनी दखल घेत, कोंढाळी ग्रा प चे पदाधिकारी यांचे सोबत कोंढाळी ग्रामपंचायत क्षेत्रात उपलब्ध असलेले जागेत खेळाचे मैदानाकरिता उपलब्ध जागेची नामदार अनिल देशमुख यांनी ग्रा प पदाधिकार्यांसोबत पाहणी केली, या प्रसंगी जि प सदस्य सलिल देशमुख हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते।

मिळालेल्या माहिती नुसार काटोल तालुका क्रीडा सकुल समिती चे अध्यक्ष व या भागाचे आमदार व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोंढाळी भागातील दौर्यावर असतांना कोंढाळी ग्रामपंचायत प्रतिनिधी , येथील खेळाडू व नगरवासीयांचे मागणीवरून कोंढाळी करिता क्रीडा संकुलाचे निर्मिती करीता लागनारी जमीनी ची प्रत्येक पाहणी केली, कोंढाळी ग्रा प भागात उपलब्ध जागेत क्रीडा संकुल बनवून कोंढाळी व या परिसरातील खेळाडूं करिता अद्यावत मैदान उपलब्ध व्हावे या बाबद नामदार अनिल देशमुख यांनी लक्ष घातले असुन कोंढाळी येथील क्रीडा संकुलाचे निर्मिती करीता उपलब्ध (सात एकर) जागेत क्रीडा संकुला करीता संरक्षण भिंत,क्रीडांगण समपातळीकरण करने, 400मिटर धवन पथ बनविने, फुटबॉल, खो खो , व्हालीबाल , कबड्डी,एम्पी थेयटर विथ शाॅप, पार्किंग, विद्युतीकरन, इत्यादिची सोयी करीता विकास निधी मंजूर करण्यात यावे या बाबद कार्यवाही करीता संबधीत विभागाला निर्देश दिले आहे.

कोंढाळी येथे क्रीडांगण व्हावे या करीता कोंढाळी चे सरपंच केशवराव धुर्वे ,उपसरपंच स्वप्निल व्यास, ज्येष्ठ सदस्य संजय राऊत, कमलेश गुप्ता, सह कोंढाळी ग्रा प चे ग्रा प सदस्य जि प सदस्य सलिल देशमुख यांचे कडे या प्रकरणी सतत पाठपुरा करत होते या प्रकरणी या भागाचे आमदार व गृहमंत्री अनिल देशमुख संबधीत विभागाला कार्यवाही करीता पत्र दिले या करीता या भागातील खेळाडू व नागरीकांनी सर्व जनप्रतिनिधिं चे आभार मानले आहे ।

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …