*एंसबा शिवारा च्या पेंच नदीतुन अवैध रेती चोरी करणार्या तीन आरोपींना कन्हान पोलीसांनी पकडले , तर इतर आरोपी घटनास्थळावरुन पासार*
*कन्हान पोलीसांनी कारवाई दरम्यान पोकलेंड,जेसीबी,दोन ट्रक,दोन वाहन ,२६२ ब्रॉस रेती असा एकुण ९०,७२,००० रूपयाचा मुद्देमाल केला जप्त*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन च्या हदीत येणार्या एंसबा शिवारात असलेल्या पेंच नदी पात्रातुन अवैधरित्या चोरीची रेती वाहतुक करतांना कन्हान पोलीसांना आढळुन आल्यास कन्हान पोलीसांनी कारवाई दरम्यान पोकलेंड,जेसीबी,दोन ट्रक, टोयाटो वाहन, मारोती सुझकी वाहन ,२६२ ब्रॉस रेती, दोन प्लास्टिक ड्रम, १२० लिटर डिझेल असा अंदाजे एकुण ९० लाख ७२ हजार रूपयाचा मुद्देमालासह तीन आरोपी पकडले तर इतर आरोपी घटनास्थळा वरुन पोलीसांना पाहुन पसार झाले.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार कन्हान पोलीस स्टेशन च्या हदीत येणार्या पेंच व कन्हान नदी पात्रातुन बिनधास्त पणे अवैध रेती चोरीचे प्रमाण दिवसेन-दिवस वाढत असुन असामाजिक तत्व डोके वर काढत आहे. रविवार दिनांक ०७ फेब्रुवारी च्या सकाळी तडके रात्री २ वाजून १० मिनटांनी ते ३ वाजुन १५ मिनटाच्या सुमारास कन्हान पोलीस पेट्रोलिंग करित असतांना काही इसम पोकलेंड, जेसीबी व ट्रक च्या मदतीने अवैध रेती वाहतुक करित असल्याचे गुप्त माहिती कन्हान पोलीसांना मिळाली असता कन्हान पोलीस व कर्मचारी स्टाप पंचासह एंसबा शिवारात असलेल्या पेंच नदी पात्रात पोहचले असता त्यांना काही इसम पोकलेंड, जेसीबी व ट्रक च्या मदतीने अवैध रेती वाहतुक करतांना आढळले असता काही इसम पोलीसांना पाहुन घटनास्थळा वरुन पसार झाले .
तर काही आरोपींना पकडण्यात कन्हान पोलीसांना यश आले . या कारवाई दरम्यान कन्हान पोलीसांनी आरोपी १) रत्नाकर नथुजी चक्रपाणी वय ४९ वर्ष राहणार वार्ड नंबर २ मिलींद चौक खापरखेडा, २) मो.शोयब शबीर अंसारी वय १८ वर्ष राहणार संजय नगर बंगाली कॉलोनी कमसरी बाजार कामठी, ३) रमीज खान हमीद खान वय २६ वर्ष राहणार कादर झेंडा कामठी यांना पकडुण कन्हान पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचा जवळुन पोकलेंड अंदाजे किंमत ३० लाख रुपए , जेसीबी क्रमांक एम एच ४०बीई ८०२७ किंमत २० लाख, ट्रक क्रमांक एम एच ४०एन ०१६८ किंमत १० लाख, ट्रक मधिल २ ब्रास रेती किंमत ६ हजार, ट्रक क्रमांक एम एच ३१ एम ६३६६ किंमत १० लाख, ट्रक मधिल २ ब्रास रेती किंमत ६ हजार, टोयाटो कॉलीस वाहन क्रमांक एम एच ४९ ए ३५२ किंमत ५ लाख, मारोती सुझकी ब्रेझा वाहन क्रमांक एम एच ४० ए ३७४९ किंमत ८ लाख , नदी शेजारी शेतात २५० ब्रास रेती किंमत ७ लाख ५० हजार, प्लास्टीक ड्रम मध्ये १२० लिटर डिझेल किंमत ९६०० , एक प्लास्टीक ड्रम किंमत ४०० रुपये असा अंदाजे एकुण ९०,७२,००० (नव्वद लाख बाहत्तर हजार रूपये ) च्या मुद्देमाल जप्त केले . कन्हान पोलीसांनी जेसीबी, एक ट्रक, टोयाटो, मारूती सुझकी वाहन, एक ड्रम व १२० लिटर डिझेल सह तीन आरोपींना कन्हान पोलीस स्टेशन ला आणले तर उर्वरित योग्य साधन नसल्याने घटनास्थळी सुरक्षित ठेवुन सात ही आरोपी वर कन्हान पोलीसांनी कलम ३७९, १०९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. ही कार्यवाई नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे थानेदार अरूण त्रिपाठी, एपीआई सतिश मेश्राम, पोलीस उप निरीक्षक सुरजुसे, पोलीस उप निरीक्षक जावेद शेख, नापोशि कुणाल पारधी, राजेंद्र गौतम, पोशि सुधिर चव्हाण, शरद गिते, सम्राट वनमती, जितेंद्र गावंडे आदि ने ही कारवाई केली .