*सावनेर परिसराकढे वळला वाघ*

*सावनेर परिसराकढे वळला वाघ*


*वन विभाग अधिकार्यांचे भाकीत*

*सावनेरःनागपूर कळमेश्वर मार्गावरिल फेटरी ते येरला या भागात धुमाकुळ माजविणारा पट्टेदार वाघ आता सावनेर तालुका हद्दीत वळला असल्याची माहीती उघडकीस येत आहे*
*फेटरी येरला परिसरात चार जनावरांचा शिकार करुण परिसरात धुमाकुळ घालत असलेल्या वाघाचे शोध घेण्या करिता वन विभागाने शोध मोहीम वाढवून मागील दोन दिवसापासून कळमेश्वर,फेटरी,येरला या क्षेत्रात तीन वेगवेगळे पथक तयार करुण कसुन शोध घेतल्या जात असुन वाघाने शिकार केलेल्या ठिकाणासह इतरत्र सुरक्षा कँमेरे सुद्धा लावण्यात आले आहे तरीही सदर वाघोबाने सुरक्षा कँमेरे व वन अधिकार्यांना अद्याप दर्श दिले नाही.*


*मिळालेल्या माहिती नुसार सोमवार ला सकाळच्या दरम्यान सावनेर तालुक्यातील सिंधी या गावचे सरपंच यांच्या शेतात आढळलेल्या वाघाच्या पायाच्या पदचिन्हाचा शोधा वरुण वन अधिकारी यांनी सदर वाघ हा सावनेर तालुक्याच्या दिशेने वळला असावा असे अंदाज व्यक्त केले तर कळमेश्वर क्षेत्रातील ब्राम्हणी फाटा परिसरातील एका शेतात पसरलेल्या रक्ताचे व जनावराच्या आतड्या बघून सदर वाघाने जनावराची शिकार केल्याची सुचना वन अधिकार्यांना मिळताच रोज सोमवार दि.16 सप्टेंबर ला सावनेर कळमेश्वर तालुक्यात केन्द्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध बाधकाम व राष्ट्रीय महामार्गाचे भुमि पुजन व लोकार्पन सोहळा असल्याने कोणतीही अप्रीय घटना घडून सदर कार्यक्रमात व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून वन अधिकारी यांची चांगलीच दमछाक होणार म्हणून वन अधिकारी कर्मचार्यांनी सदर घटनास्थळी तात्काळ पोहचून सदर घटेत वाघ असल्याचे कोणतेही संकेत न मिळाल्याने सुटकेचा श्वास घेतला*

*नागरिकांना सतर्कतेचे आव्हान*

*वन विभाग नागपूर जिल्हाच्या वतीनी सावनेर तालुक्यातील झुडपी भाग तसेच नदि,पांधनरस्ते,निर्जन स्थानावर शेती करणारे शेतकरी तसेच वन परिक्षेत्रात राहणार्यां नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच आपल्या शेतात आथवा भागात वाघाच्या पायाचे ठसे अथवा वास्तव्य असल्यास वन परिक्षेत्र अधिकारी कळमेश्वर,खापा अथवा जिल्हा वन विभाग कार्यालयास तात्काळ सुचीत करण्याचे निवेदन केले आहे.*

Check Also

*आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत फाँसी दो।*

🔊 Listen to this *आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत …