*सोनपूर – आदासा गट ग्रामपंचायत सरपंच सौ निताताई संजय सहारे व उपसरपंच निलेश रामभाऊ कडू*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
कळमेश्वर – कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर आदासा ही गट ग्रामपंचायत बिनविरोध झाली असुन सरपंच सौ निताताई संजय सहारे उपसरपंच निलेश रामभाऊ कडू यांची एकमताने निवड करण्यात आली.
सदर गट ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी असे आव्हान राज्याचे पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय व व युवक क्रीडा कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले होते त्यांनी केलेल्या आव्हानाला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत ही ग्रामपंचायत बिनविरोध करून दिली होती हे विशेष.
नवनिर्वाचित सदस्यामधे निलेश रामभाऊ कडू,लीना संजय कडू,नीता प्रभाकर जिचकार,अक्षय धुर्वे,नीतू सहारे,अलका सुधाकर पडोळे, चेतन शिवकुमार निंबाळकर,शिल्पा रवींद्र,पडोळे सुरेखा, व विठोबा गायकवाड विजयी ग्रामपंचायत सदस्य असुन आज दि 11 फेब्रुवारी ला पार पडलेल्या सरपंच पदाकरिता सौ.निता संजय सहारे तर उपसरपंच पदावर निलेश रामभाऊ कडू यांची निवड करण्यात आली याप्रसंगी जि प सदस्य महेंद्र डोंगरे, खरेदी-विक्री अध्यक्ष बाबा कोठे,उपसभापती जयश्री वाळके,माजी सभापती वैभव घोंगे,माजी उपसभापती नरेंद्र पालटकर,माजी सरपंच राजेंद्र जिचकार,गणपत काकडे,नागोराव भोयर,प्रकाश धोटे,संजय कडू,सुधाकर पडोळे,किशोर नागपुरे,नागोराव कोहळे, अजाबराव चिखले, उकंडराव धवड,संदीप गोतमारे, अजाबराव चिखले,श्रीराम धोटे,शिवकुमार पडोळे,इसाक शेख,श्रावण पडोळे,बालाजी कडू व इतर मान्यवरांनी नवनिर्वाचितांना शुभेच्छा दिल्या.सोबतच नवनिर्वाचितांनी गावातील श्रीशमिविघ्नेश मंदिरात पोहचून सामुहिक आरती करुण पुढील पाच वर्ष आमच्या हातातून गावाचा विकास घडून नागरिकांनी टाकलेल्या विश्वासावर खरे उतरू दे असे श्रीगणेशास सकडे़ घातले.