*व्हॅलेंटाईन डे जवळ येताच ग्रामीण भागात उत्साह तरुणाईने व्यक्त केल्या भावना*

*व्हॅलेंटाईन डे जवळ येताच ग्रामीण भागात उत्साह
तरुणाईने व्यक्त केल्या भावना*

 

नरखेड प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे

“प्रेमात नकार मिळाला” तो स्वीकारण्याची ताकद ठेवा !

मोवाड:-     कब तक रुठेगी, चिखेंगी चील्लायेगीदि

लं कहता है ,एक दिन हसीना मान जायेगी

” किंवा तू हा कर! या ना कर! तू है मेरी किरण,,”

या सारख्या हिंदी चित्रपटातील गाण्यांमधून एकतर्फी प्रेमाच्या अतिरेकी कहाण्या रंगविण्यात आल्या ,,, एकतर्फी प्रेमाला” ग्लोरिफाय “करणाऱ्या अशा प्रेमामुळेच कितीतरी मुलीवर हल्ले झालेत , प्रपोज करण्यासाठी एकाहून एक शक्कल लढवा मात्र ,” नकार मिळाल्यानंतर तो पचवण्याची क्षमताही ठेवा ” असा संदेश देत प्रेमाची व्याख्या अधिक व्यापक करण्याची गरज आहे, या शब्दात आजच्या तरुणाईने आपल्या भावना बोलून दाखवल्या आहे.

प्रेम व्यक्त करणे आणि ते निभविण्याचा नवतरुणाईचा उत्सव म्हणून ” व्हॅलेन्टाइन डे” साजरा केला जातो .
आजची तरुणपीढी व्हॅलेंटाईन आठवडा (विक) अनोख्या पद्धतीने साजरा करतात. या विकमधील “व्हॅलेंटाईन डे” हा रविवारी साजरा करण्यात येणार आहे. या निमीत्त या परिसरातील तरुणाईसोबत खर प्रेम काय आहे. आणि कस असू नये यावर चर्चा केली.
आपले विचार युवक-युवतींना मुक्तपणे मांडले. होकार मिळो की नकार आपली प्रिय व्यक्ती आनंदी राहावी असा विचार मांडणाराचं खरा प्रियकर किंवा प्रेयसी आहे ,असं म्हणता येईल असं या युवकांनी ठामपणे सांगितलं .

काय म्हणते आजची युवा मंडळी

प्रेम करण्यात वाईट काहीच नाही ,पण एकमेकांविषयी आदर असायला हवा ,,,,,, – माधुरी

नकार दिल्यानंतर पुढच्या व्यक्तीला पुन्हा स्वतःहून होकार द्यावासा वाटेल असं वर्तन करा- शिल्पा

सोशल मीडियावर पूर्णपणे अवलंबून राहू नका प्रत्यक्ष खात्री करा,नाहीतर फेसबुक वर झालेली ओळख आणि व्हाट्स अँपवर झालेलं प्रेम तिथेच मर्यादित राहील.- आकाश मानेकर

प्रेमात फसवणूक होऊ नये यासाठी घरच्या वडीलधाऱ्यांना विश्वासात घ्या- जयश्री

नकार आला म्हणजे आभाळ कोसळलं अस नाही. नकारही आनंदाने स्विकार करा- दिनेश घावडे

नकार दिला म्हणून व्यसनाधीन होऊ नये,यशासाठी चुकीचे मार्ग अवलंबू नका.शेवटी आईबाबा आपल्यावर खूप प्रेम करतात. याचा विसर पडू देवू नका-

यश चाळीसगावकर

ही वेदेशी संस्कृती आहे..आपली संस्कृती सोडून युवा पिढी या विदेशी संस्कृती चे जतन करतांनी पाहायला मिळते..यांच्यातून कित्येक मुलींचे आयुष्य खराब झाले,कित्येकांना मरणाच्या दारात सोडून प्रेम हद्दपार झाले.. शेवटी निराश पदरी.. आपले परके आणि परके आपले करतांना अनेकांना पाहले..या विदेशी संकृती पायी हळुवार पण आपली संस्कृती आपला इतिहास,आपले दिवस आपण विसरत चाललो आहे..हे कुठेतरी थांबले पाहिजे..जन्मदेणारे आई.. वडीलांनपेक्षा हातावरील फोडासारख बहिणीला जपणाऱ्या भावापेक्षा जगात प्रेम कोणी देऊ शकत नाही हे प्रत्येक बहिणीला,मुलीला समजले पाहिजे..पण तसे पाहायला मिळत नाही याची खंत वाटते..
ललित खंडेलवाल

प्रेमात हवे शहाणपण

तुम्ही कुणावर प्रेम करत असाल,मात्र त्या व्यक्तीचं प्रेम तुमच्यावर नसेल, तर ते मान्य करण्यात जास्त शहाणपणा आहे. तूम्हाला कितीही त्रास झाला, राग आला, दुःख झाले तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा. किमान तुमच्या प्रिय व्यक्तीला दुखवायचं नाही एवढ तरी मनोमन ठरवा. तुमचं प्रेम जपण्याचा तूम्हाला अधिकार आहे. मात्र त्याचा उलट परिणाम तूमच्यावर किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीवर होणार नाही, याची काळजी घ्या. असा सल्ला अनेक प्रेमविवाह करणारे त्यांच्या बोलण्यातून सांगतात .

प्रेम क्षणिक नसावे

पूर्वी आपल्या प्रेमचा संदेश आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या दिव्यातून जाव लागायचं.,स्व:हस्ताक्षरात लिहिलेली प्रेम चिठ्ठी, त्यात आवडत्या कवीची चोरलेल्या चार ओळी लिहीणे, हा सोपा मार्ग होता. पण चिठ्ठी लिहिल्यानंतर ती पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कली लढवाव्या लागायच्या. त्यात ही चिठ्ठी चुकून घरच्यांच्या हाती लागली तर काय? हे संकट होतचं. मात्र आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग खुला आहे. फेसबुक ,व्हॉटअप यांसारख्या सोशल मिडियावरच प्रेम व्यक्त होते. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात आणि याच सोशल मिडियावरच “ब्रेकअप ” चा संदेश पाठवून दोघेही आपआपल्या वाटेनं लागतात ,प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग सोपा झाला मात्र व्यक्त केलेलं प्रमे देखील क्षणिक झालय. मात्र व्यक्त झालेले प्रेम क्षणिक नसावं, यासाठी त्या प्रेमात जीव ओतण्याची गरज आहे , असे काही तज्ञानी म्हटल।

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …