*बेलोना येथील गजानन मारोती ठोंबरे याच्या घराला लागली आग आगीमुळे लाखो रुपयांच्या मालाची झाली राख*
बेलोना प्रतिनिधी :चंद्रशेखर मस्के
बेलोना – रात्री 11.45 च्या सुमारास ठोंबरे कुटुंब झोपले असता अचानक आपल्या घराला लागलेल्या आगीला पाघुन घरातून बाहेर पडले आणि आरडा ओरडा केली असता गावकरी जमवली आग विजवण्याचे प्रयत्न करू लागले आगीने तीव्र पेट घेतली असता आणि घरात असलेल्या सिलेंडर मुळे गावकरी घाबरत आग विझवण्यासाठी बरेच पर्यंत करीत रहले गावकरी जनतेने फायर ब्रिगेड च्या गाडीला फोन लावले अस्ता नरखेड वरून गाडी येण्यास वेळ लागल्यामुळे मोवाड वरून बोलावण्यात आली गाडी आल्यामुळे आग विझवण्यात गावकरी जनतेस सहकार्य मिळाले .
परतू आगीच्या झपाट्याने ठोंबरे याचे घर पूर्ण जळून राख झाल्ये त्यात अंगणवाडी सेविका याचा रीकर्ड संपूर्ण जळला तसेच घरीच गृहवूद्योग असल्यामुळे त्याचे साहित्य ,शेतीला लागणाऱ्या गरजू वस्तू पिविसी पाईप पंच ,स्प्रे पंप अवजारे ,धान्याच्या कोठारी कपाट, टिव्ही, कुलर, दिवाण, सोपे,कपडे मुलांचे तसेच घरातील महत्त्वाचे कागदे पत्रे, नुकत्याच काढून आणलेले महिला बचत गटाचे 150000 दीड लाख रोख रक्कम तसेच मुलाच्या लग्नासाठी बनून ठेवलेले तसेच घरातील दाग दागिने .शेतीतून आलेला कापूस ,तूर या संपूर्ण मालाची ऐकून 9 ते 10 लाख रुपयाचे नुकासन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे , नरखेडचे पटवारी साहेब बेलोना पटवारी साहेब आणि व त्यांचा चमू मोवाड पोलीस चवकीचे पोलीस बेलोना विदुत्त मंडळाचे इंजिनियर व कर्मचारी यांनी घटनेची चवकशी करून आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अशी पाहणी करून सांगितले. आग कश्यामुळे लागली हा तपास सुरू आहे .ठोंबरे कुटुंब याच्या अंगावर असलेलेच कपडे फक्त शिलक राहिलेले आहेत, पूर्ण मालाची घराची जीवनावश्यक वस्तूंची राख झाल्यामुळे त्यांच्यात शोकाकूळ पसरलेली आहेत .
गावकरी जनतेने आग विजवण्यात मोलाची कामगिरी बजावली असून, फायर ब्रिगेडवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जर गाडी लवकर आली असती तर इतकी नुकसानी झाली नसती अशी गावकरी आणि ठोंबरे कुटुंब याचे म्हणे आहे
शासनाने याकडे दुर्लक्ष न करता झालेल्या नुकसानीमुळे त्यांचा प्रपंच कसा लवकर चालेल यासाठी आर्थिक मदत करावी तसेच त्यांच्या बाजूला असलेले टोमदेव विठ्ठ्ल बनाईत यांच्या घरावरून आग विझवण्यासाठी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी गावकरी जनतेत चर्चा सुरू आहे.