*१० हजारांची लाच मागितली प्रकरणी वनरक्षकावर गुन्हा दाखल*
नरखेड प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे
जलालखेडा – (ता.१२) नरखेड तालुक्यातील लोहारी सावगा येथे कार्यरत असलेल्या वनरक्षक यांनी विना परवानगी तोडलेले सागाची झाडे परत करण्यासाठी 10 हजाराची लाच मागितली. याबाबत वनरक्षक याची लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीच्या आधारावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण आरोपीला संशय आल्याने वनरक्षक विजय मुंढे यांनी लाच घेण्यास नकार दिला. व तो घटना स्थकावरू पसार झाला परंतु केलेल्या तक्रारीवरून वनरक्षक विजय भगवान मुंढे वय वर्ष 29 यांच्या विरुद्ध 34 / 2021कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 संशोधन सन 2018 नुसार गुन्हा दाखल केला .असून त्याचा शोध घेणे सुरू आहे. ही कार्यवाही संजीवनी थोरात पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्यूरो नागपूर व लबडे पोलीस निरीक्षक अँटी करप्शन नागपूर यांनी केली असून अजून पर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.