*नौकरीचे आमीश दाखवून लाखोची फसवणूक*
*गुन्हा दाखल आरोपी अद्याप मोकाट़*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर: सुरक्षा दलात व सुपरवायजर तसेच वेगवेगळया पदावर नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवून सावनेर मधील एका गरिब महीलेची फसवणूक करण्यात आली.
फसवणूक करणारा करण माणिक घाटोळ रा.नागपुर तर सौ.बेबीनंदा मेघराज गजभीये वय 42 वर्ष रा.भोगांडे ले आउट सावनेर असे फिर्यादीचे नांव आहे.
सावनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोंगाडे ले आऊट रहीवासी फिर्यादी सौ.बेबीनंदा मेघराज गजभीये वय 42 हीला तसेच ईतरांना आरोपी करण माणिक घाटोळ रा.नागपुर याने आपल्या जाळ्यात अडकवत सुरक्षा दलात व सुपरवायजर तसेच वेगवेगळया पदावर नोकरी लावुन देतो असे दिव्य स्वप्न दाखवुन फिर्यादी व ईतर साक्षदार यांचेकडुण 1,62,000/-रू घेवुन त्यांना नोकरी दिली नाही.फीर्यादींनी वारंवार विनंती करुण ही आज उद्या करत वेळ करु लागला वारंवार फोन केला असता फोनवर सुध्दा बोलन्याचे टाळू लागला सदरहू टाळाटाळी मुळे आरोपी आपली फसवणुक करत असल्याचे निदर्शनास येताच फीर्यादींनी सावनेर पोलीसांना लेखी तक्रार केली असता सदर प्रकरणी फिर्यादीचे रीपोर्टवरून पो.स्टे सावनेर येथे कलम 420 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय निशांत फुलेकर तपास करित आहे.