*शहरातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आता भाजीविक्रेता,फळविक्रेता,किराणा,बेकरी,हॉटेल,रेस्टॉरंट, सलून,मंगल कार्यालय इत्यादी मध्ये काम करणारी कामगार व मालकांची आता कोरोना टेंस्टटिंग होणार -तहसीलदार चैताली दराडे*
*समारंभात सोशल डिस्टनसिंग न पाळल्यास मंगल कार्यालय, लॉन वर दंडात्मक कारवाई व सील करणार – न.प. मुख्याधिकारी सावनेर ” स्मिता काळे “*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरसिया
सावनेर – शहरात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तहसील व नगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याकरिता सुरू केले आहे.
निर्धारित संख्येपेक्षा अधिक लोक आढळून आल्यानंतर लग्न समारंभ असलेले कुटुंबीय व सभागृहाच्या संचालकांनवर दंड ठोठावला जाइल असे पत्रपरिषदेत सांगितले.
गेल्या काही दिवसापासून शहरातील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आले असुन तसेच बाजारपेठां मध्येही व्यावसायिकांना खबरदारीच्या अनेक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आले.
करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर प्रशासनाने लग्न समारंभामध्ये पाहुण्यांच्या संख्येबाबत नियमावली जाहीर केली होती. यात ५०पेक्षा अधिक पाहुण्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर शहरातील लग्न समारंभांमध्ये मोठी गर्दी दिसू लागली. विशेष म्हणजे या नियमात प्रशासनाने कुठलाही बदल केला नसताना नागरिकांकडून सर्रासपणे याचे उल्लंघन होताना दिसत आहे. मात्र, करोना रुग्णांची गेल्या काही दिवसातील वाढती संख्या लक्षात घेता आता शासनाद्वारे निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्या आढळल्यास संबंधित मंगल कार्यालय, लॉन सील करण्याचे आदेश न.प.सावनेर चे मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिले आहेत.
शहरातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आता भाजी विक्रेता,फळ विक्रेता,किराणा,बेकरी,हॉटेल,रेस्टॉरंट,सलून,मंगल कार्यालय मध्ये काम करणारी कामगार व मालकांची कोरोना टेंस्टटिंग होणार व ही साखळी खंडित करण्यासाठी नगरपालिकेने चाचणीची गती वाढविली आहे. मात्र चाचणी केल्यानंतर रुग्ण कुणाच्याही संपर्कात येऊ नये व त्याला त्वरित उपचार मिळावे यासाठी सर्व शासकीय व खासगी तपासणी केन्द्रांनु तपासणीचा अहवाल २४ तासांच्या आत देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.