*गॅस टँकर उलटल्योने चालकाचा मृत्यू* *हेटी-काटोल बायपास मार्गावरील घटना*

*गॅस टँकर उलटल्योने चालकाचा मृत्यू*

*हेटी-काटोल बायपास मार्गावरील घटना*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः हेटी काटोल बायपास मार्गावर वळण घेत असतानाच अनियंत्रित झालेला टँकर उलटल्याने झालेल्या भिषण अपघातात टैंकरखाली दबून चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

*सदर घटना सावनेर हेटी-काटोल बायपास मार्गावर बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली असुन यात फिरोज अजहूल हक (२२, रा. मजगाव, उत्तर प्रदेश) असे मृत टँकरचालकाचे नाव आहे.*


*फिरोज हक हा एमएच-४०/बीएल-४४२७ क्रमांकाचा गॅस टँकर घेऊन बैतुल येथून नागपूर एमआयडीसी येथे जात होता.* *सावनेर शहरालगत असलेल्या या हेटी-काटोल बायपास मार्गावर वळण घेताना अनियंत्रित झालेला टैंकर उलटल्याने त्याखाली दबून चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.*

*घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या आगोमाग हितज्योती फाऊंडेशनचे समाजसेवी हितेश बन्सोड यांनी आपल्या सहकारी मीत्रांच्या पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सावनेर शासकीय रुग्णालयात पाठविला.*

*सदर प्रकरणी सावनेर पोलिसांनी आकस्मिक अपघाताची नोंद केली असून, ठाणेदार अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस हवालदार बोरकर करीत आहेत.*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …