*अश्याने कोरोना हरवणार काय*
*ना मास्क ना सोशल डिस्टंन्सीन,जिथे पाहाल तीथेच गर्दी*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – राज्यात वाढत्या कोरोना मुळे सर्व शासकीय यंत्रणेच्या भुवया वर चढल्या असुन या वाढत्या प्रादुर्भावावर आळा आणन्याकरिता आता टोकाचे पाऊल उचलण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे.
त्याकरिता संपूर्ण जिल्ह्यात मा.जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या दिशानिर्देशानुसार कठोर पाऊले उचलत सर्वप्रथम दुध,भाजी,वर्तमानपत्र,किराणा व हाँटेल व्यवसायांतील सर्वांची कोवीड़19 चाचणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपायोजना आखल्या जात असुन सोबतच लग्न समारंभ,गर्दीचे ठीकाण, विशेष आयोजने इत्यादिवरही प्रशासनाची करडी नजर असणार.हे खरे परंतू मागील दोन चार महिन्यापासून स्वच्छंदपणे वावरणाऱ्या बेपरवाह मानवी जातीला याचे काहीही सोयरेसुतक नसल्याचे निदर्शनास येत आहे.
वाढत्या कोरोना संदर्भाच्या बातम्या व त्यातून दगावलेल्यांच्या बातम्यांनी सोशल मीडिया, टिव्ही चँनल्स व समाचार पत्रे कीतीही रंगुन येत असली तरी जनसामान्य मानसात “अपुन को क्या” चा भाव पणपत असुन सर्वत्र मोठा “कोरोना ब्लास्ट” होण्याचु शक्यता नाकारता येत नाही याचे प्रत्यक्ष उदाहरण तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सावनेर शहरातील आठवडी बाजारासह दररोज उघड्या डोळ्यांनी बघावयास मीळतो.
शहराच्या मुख्य रस्त्यावर भरणारा नियमित व आठवडी बाजार स्थानिक नगर प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचा परिचय तर देतोच सोबतच मुख्य बाजारातील गर्दीवर अथवा सोशल डिस्टन्सींगवरही कुणाचे अंकुश उरले नाही. यावर उपाययोजना म्हणून मागील दोन दिवसापासून नगर प्रशासनातर्फे फक्त भोंगा वाजवून स्वःताची पाठ थोपटल्या जात आहे.तर पोलीस दादांवर यासंदर्भात कोणतीही जबाबदारी असल्याचे निदर्शनास येत नाही.
रस्त्यावर लागणारी दुकाने त्यांचे जवळ सेनिटायझर ची व्यवस्था नाही,तोंडावर मास्क नाही,सोशल डिस्टन्सींग नाही असेच मिळतेजुळते हाल शहरातील बँकांचे ही असल्यामुळे केव्हाही मोठा भडका उडाल्यास कुणालाही काही आश्चर्य नको.