*आपसी वादातून प्राणघातक हल्ला* *दारापुढे कुत्र्याने शी केल्याच्या वादावरून कुर्हाडीने केले सपासप वार* *जखमीला पुढील उपचारासाठी केले नागपुर रवाना*

*आपसी वादातून प्राणघातक हल्ला*

*दारापुढे कुत्र्याने शी केल्याच्या वादावरून कुर्हाडीने केले सपासप वार*


*जखमीला पुढील उपचारासाठी केले नागपुर रवाना*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसिया*

*सावनेरः सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोडा झोपडपट्टीत दुपारी 1-00 वाजताचे दरम्यान आरोपी इंदरलाल झनकलाल नेवरे यांने कुर्हाडीने शेजारच्या महिलेवर प्राणघातक हल्ला चढवून तीला जखमी केले*

*मिळालेल्या माहितीनुसार जखमी सोनु मोहन उईके 45 व इंदरलाल झनकलाल नेवरे 45 दोघेही वाघोडो झोपडपट्टीत शेजारीच राहत असुन जखमी सोनु उईके हीच्या पाळीव कुत्र्यानी आरोपी इंदरलाल च्या दारापुढे शी केल्याने आरोपी इंदरलालने चिडून शिवीगाळ करत आपल्या कुत्र्याला आपल्या घरी ठेवा यावरून दोघात शब्दिक वाद झाला परंतु काही वेळानंतर आरोपीने सोनु उईके च्या घरात घुसून तीच्यावर कुर्हाडीने सपासप वार करत तीला गंभीररित्या जखमी केले.*


*घडलेल्या दुर्दैवी प्रकाराची सुचना शेजारी राहणाऱ्या फीर्यादी फुलकुमारी धर्मेंद्र यादव हीने सावनेर पोलीसांना देताच पोलीस निरिक्षक अशोक कोळी आपल्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांना घेऊण घटनास्थळी धाव घेत जखमीला प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर ला उपचारासाठी रविना करुण लगच आरोपीचा शोध घेऊण त्यास ताब्यात घेतले*


*जखमी सोनु उईके हिच्या मानेवर व पाठीवर गंभीर वार असल्यामुळे तीला पुढील उपचारासाठी मेओ हाँस्पीटल नागपुर येथे रवाना करण्यात आले असुन आरोपी इंदरलाल च्या विरोधात भादवी कलम 307,452,504 नुसार गुन्ह्याची नोंद करुण पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय निशांत फुलेकर सदर घटनेचा तपास करत आहे*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …