*मध्य प्रदेश येथुन छत्तीसगढ़ राज्यात अवैध दारू तस्करी करण्यारा आरोपीस लाखोंच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड*

*मध्य प्रदेश येथुन छत्तीसगढ़ राज्यात अवैध दारू तस्करी करण्यारा आरोपीस लाखोंच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड*

विशेष प्रतिनिधि

नागपुर/सावनेर – दिनांक २३/०२/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण चे पथक सावनेर उपवभिागात पेट्रोलींग करीत असता पोलीस मित्राद्वारे खात्रीशिर माहिती मिळाली की , मध्यप्रदेश- पांढुर्णा ते नागपूर च्या दिशेने चारचाकी वाहन टाटा सफारी गाडी मध्ये अवैधरित्या मध्यप्रदेश येथुन दारूची वाहतुक करीत असल्याचे माहितीवरून मौजा सावळी फाटा जवळ बॅरीकेट लावुन नाकाबंदी केली असता ग्रे रंगाची टाटा सफारी चारचाकी वाहन येतांना दिसल्यावरून त्यास थाबविण्याचा इशारा केला असता चालकाने नाकाबंदीचे पॉइंटवर वाहनाचा वेग कमी करून अचानक वाहन रिव्हर्स घेवुन धोकादायकरित्या वळवुन खुर्सापार -पांढुर्णा च्या दिशेने भरधाव वेगाने पळु लागला . यावरून पोलीसांनी सदर वाहनाचा पाठलाग करीत खुर्सापार आरटीओ चेक पोस्ट जवळ अत्यंत शिताफीने वाहनास थांबविले असता अंधार असल्याने वाहनातील एक इसम पळुन गेला . मोक्यावर मिळालेला चालक आरोपी नामे द्वारका पलटन वर्मा , वय ३० वर्ष , रा . वार्ड क . क . ४ शंकरपुर , ता.जि. दुर्ग , राज्य छत्तीसगढ़ यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातील ग्रे रंगाचे टाटा सफारी चार चाकी क . CG – 07 – AM – 0360 ची झडती घेतली असता वाहनामध्ये एकुण ३६ नग पांढ – या रंगांचे खोके ज्यावर गोवा विस्की असे लिहीलेले ज्यामध्ये एकुण १८०० नग प्रत्येकी १८०ml च्या गोवा विस्की च्या काचेच्या निपा किं . २,३४,०० / -रू व वाहन असा एकुण ६,३४,००० / -रू चा माल जप्त करण्यात आला . आरोपीस केलेल्या विचारपुस दरम्यान सदरची विदेशी दारू ही मुलताई मध्य प्रदेश येथुन खरेदी करून जि . दुर्ग राज्य छत्तीसगढ येथे विक्री करीता घेवुन जात असल्याचे सांगीतले . आरोपीस मुद्देमालासह पो.स्टे . केळवद यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पो.स्टे . केळवद करीत आहे . सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री . राकेश ओला नागपुर ग्रामीण , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . राहुल माकणिकर ना . ग्रा . यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल जिटटावार , सपोनि जितेंद्र वैरागडे , पोउपनि नरेंद्र गौरखेडे , सफी बाबा केचे , पोहवा चंद्रशेखर घडेकर , पोना राजेंद्र रेवतकर , पोशि रोहन डाखोरे तसेच पो.स्टे . केळवद येथील पो.नि. दिलीप ठाकुर व त्यांचे स्टॉफ यांनी संयुक्तरित्या पार पाडली

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …