*सावनेर येथे सांडपाण्यामुळे त्रस्त गिरीश संकुलवासी*
*डासांच्या वाढत्या उत्पत्तीमुळे ताप,मलेरिया,चिकनगुणीया,गेस्ट्रो सारख्या साथीच्या आजार पसरण्याची भीती*
*सावनेर नगर प्रशासन कुंभकर्णी निद्रेत*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर ः शहरातील प्रभाग क्र.2 वार्ड क्र.4 मधिल गीरिश संकुल लागत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या दोन्हीही बाजुला मोठ्या प्रमाणात एकत्र होत असलेल्या सांडपाण्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य तसेत दुर्गंधीच्या वातावराणासह साथीच्या आजाराची भीती निर्माण झाली आहे.
*मिळालेल्या माहितीनुसार सावनेर शहरातील वार्ड क्र 4 मधील गीरीश संकुल जवळून वाहणाऱ्या नहराच्या बाजुला शहरातील पंचशील नगर,रेल्वे स्टेशन, नाईक लेआऊट इत्यादी परिसरातील सांडपाण्याचा निचरा व योग्य नियोजनाच्या आभावामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असुन ताप,चिकुन गुणीया,डेंग्यू मलेरिया,सारख्या साथीच्या आजाराची भीती नाकारता येत नसल्यामुळे नागरिकांमधे भीतीचे सावट निर्माण झाले आहे.अनेकवेळा तोंडी तक्रारी करुण सुद्धा पळसाला पानं तीनच असी स्थिती निर्माण असुन मात्र नगर प्रशासनास घाम फुटत नसुन टाळाटाळीचे धोरण गीरीश संकुल वासींनकरिता जीवघेणे सिद्ध होत आहे*
*याविषयावर नगर सेवक निलेश पटे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी नगर प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर ताशारे ओढत नगरीत विकास कार्यांचा फज्जा उडाला असुन नगरीच्या विकासकार्यास खीऴ बसल्याचा खुला आरोप त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला*