*वाढत्या कोरोना संक्रमण काळात नागरिकांनी सहकार्य करावे*
-स्मिता काळे मुख्याधिकारी सावनेर
*सर्वांनी मास्कचा वापर करावा,सेनिटायझर व सोशल डिस्टन्सींगवर जातीने लक्ष द्यावे,तसेच रस्त्यावर गर्दी करु नये,अत्याआवश्यक असल्यास घरा बाहेर पडावे*
सावनेर प्रतिनिधि – सूरज सेलकर सोबत दिनेश चौरसिया
सावनेर –संपूर्ण महाराष्ट्रा सह नागपुर जिल्ह्यात दुसर्या टप्प्यातील कोवीड़ 19 च्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनानी दिलेल्या दिशानिर्देशाचे तसेच मा.जिल्हाधिकारी साहेबांच्या सुचनेनुसार दि 25 फेब्रुवारी ते 7 मार्च पर्यंत शहरात शुक्रवारी लागणारा आठवडी बाजार कडेकोट बंद तसेच शनिवार व रवीवार जिवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यवसाईक प्रतिष्ठाने बंद राहणार असल्याने नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागेल परंतू कोरोनाचे वाढते रुग्ण बघता नगर प्रशासनाला कठोर पाऊले उचलण्यास बाध्य व्हावे लागत आहे असे मत सावने नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी व्यक्त करत नागरिकांना सहकार्याचे आव्हान करत सर्वांनी मास्कचा वापर करावा,सेनिटायझर व सोशल डिस्टन्सींगवर जातीने लक्ष द्यावे,तसेच रस्त्यावर गर्दी करु नये,अत्याआवश्यक असल्यास घरा बाहेर पडावे अशी विनंती प्रसार माध्यामातून केली आहे अन्यथा नागरिकांना कटू कारवाईस पुढे जावे लागेल असे ठाम मत व्यक्त केले*