*ब्रेकिंग न्यूज़* *मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे ड्रीम प्रोजेक्ट आगीचा हवाली* *अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चिचपल्ली येथील बांबू संशोधन प्रकल्प आगीच्या भक्षस्थानी:- राजू झोडे* *दोषी अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ करण्याची राजू झोडे यांची मागणी*

*ब्रेकिंग न्यूज़*

*मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे ड्रीम प्रोजेक्ट आगीचा हवाली*

*अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चिचपल्ली येथील बांबू संशोधन प्रकल्प आगीच्या भक्षस्थानी:- राजू झोडे*

*दोषी अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ करण्याची राजू झोडे यांची मागणी*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

 

कोरपना /चंद्रपुर :- आशियातील सर्वात मोठा बांबू संशोधन प्रकल्प करोडो रुपयाची लागत लावून चिचपल्ली येथे करण्यात आला. संपूर्ण बांबू संशोधन प्रकल्प हा बांबूपासूनच तयार करण्यात आलेला होता. चिचपल्ली येथील बांबू संशोधनाचा प्रकल्प जवळपास पूर्णत्वास आलेला होता. परंतु संबंधित अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे व ढिसाळ नियोजनामुळे बांबू प्रकल्पाला मोठी आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याला जबाबदार संबंधित अधिकारी असून दोषी अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी राजू झोडे यांनी केली.


एवढा मोठा बांबू संशोधन प्रकल्प उभारण्यात आला परंतु अग्निशमन यंत्रणेची कोणतीही सुविधा याठिकाणी करण्यात आलेली नव्हती. संपूर्ण प्रकल्प हा बांबूपासून बनवण्याचे ध्येय माजी वनमंत्र्यांनी केला होता. शासनाचे करोडो रुपये खर्च करून काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात माजी वनमंत्र्यांनी मुख्य रस्त्यालगत व जंगलालगत हा प्रकल्प उभारला होता. लहानशी ठिणगीही संपूर्ण प्रकल्प जाळून भस्म करणार अशाप्रकारे बांबूच्या प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले होते. आणि न होणारी घटना आज घडून आली व संपूर्ण बांबू प्रकल्पालाच आग लागली. अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे व आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे बांबू प्रकल्प आगीत भस्मसात झाला. यामुळे शासनाच्या करोडो रुपयाचे नुकसान झाले. अशा निष्काळजी अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावे व कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू झोडे यांनी केली.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …