*अवैध रेती चोरून नेतांना कन्हान पोलीसांनी पकडले* *कन्हान पोलीसांनी कारवाई दरम्यान ट्रॅक्टर ट्राली पकडुन ५ लाख ३ हजारांचा मुद्देमाल केला जप्त*

*अवैध रेती चोरून नेतांना कन्हान पोलीसांनी पकडले*

*कन्हान पोलीसांनी कारवाई दरम्यान ट्रॅक्टर ट्राली पकडुन ५ लाख ३ हजारांचा मुद्देमाल केला जप्त*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन च्या हदीत येणार्या नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग कांद्री परिसरात अवैध रेती चोरून ट्रॅक्टर ट्रालीने वाहतुक करतांना कन्हान पोलीसांना आढळल्यास कन्हान पोलीसांनी पकडुन कारवाई दरम्यान ट्रॅक्टर, ट्राली सह १ ब्रॉस रेती असा एकुण ५ लाख ३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन पुढील तपास सुरू केला आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार कन्हान परिसरातील पेंच व कन्हान नदी पात्रातुन अवैधरित्या रेती चोरी मोठया प्रमाणात होत असुन बुृधवार दिनांक २४ फेब्रुवारी ला तडके सकाळी ४ वाजुन ४५ वाजता च्या सुमारास नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील हॉटेल ऑर्किट जवळ कांद्री येथे अवैधरित्या रेती चोरून कन्हान कडे नेतांना ट्रॅक्टर क्रमांक एम.एच ४० बी.ई ११२७ व ट्रॉली क्रमांक एम.एच ४० एल ४३५१ मध्ये १ ब्रॉस चोरीची रेती वाहतुक करतांना कन्हान पोलीसांना आढळल्यास कन्हान पोलीसांनी आरोपी ट्रॅक्टर चालक अशोक भलावी वय २८ वर्ष राहणार निमखेडा याला पकडुन व कारवाई करुन आरोपी जवळुन कन्हान पोलीसांनी ट्रॅक्टर ट्रॉली किंमत ५ लाख व १ ब्रॉस रेती किंमत ३ हजार असा एकुण ५ लाख ३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला . या प्रकरणाचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख करित आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …