*ब्रेकिंग न्युज*
*वर्धा शहरातील गोल बाजारात भिषण आग*
*अनेक दुकाने आगीत स्वाह*
विशेष प्रतिनिधि
वर्धा – शहरातील मुख्य असलेले टिळक मार्केट गोल बाजार येथे आज भीषण आग लागल्याचे समोर आले,ही आग इतकी भीषण होती की आगीचा धूर सर्वदूर पसरलेला होता आणि या आगीत बाजारतील जवळपास सर्वच मुख्य भाजीचे दुकाने जाळून खाक झाल्याचे दिसून येत होते.
*माहिती मिळताच अग्निशमन दल व अग्नीबंब घटनास्थळी डेरादाखल झाले असुन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला;यावेळी शहर पोलिसही उपस्थित होते,नेमकी आग लागण्याचे कारण आद्याप कळू शकले नाही*