*पंजाब नेशनल बैंकेचे मॅनेजर यांचा मनमर्जी मुळे नागरिक त्रस्त*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – : पारशिवणी तालुक्यातील कन्हान शहर सर्वात मोठं शहर असल्याने बाहेर गावाचे नागरिक मोठया संख्येने ये-जा करतात . आंबेडकर चौक येथे असलेली पंजाब नेशनल बैंक सध्या जास्तीत जास्त चर्चेत आहे . कारण बैंकेतील कर्मचारी ग्राहकाचा कामाला दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दररोज बैंकेचा बाहेर दिसून येत असुन कोरोना चा पादुर्भाव पाहता व आर. बी .आई. नियमानुसार वेळेत फेरबदल करण्यात आले असुन सध्या पंजाब नेशनल बैंकेचा लेन-देन काउंटर बाहेर लावण्यात आले असुन रोज पेन्शन धारच्या फौंम बारकोट लावणे पासबुक एन्ट्री या साठी इतर नागरिकांना सोबतच वयोवृध्द महिलांना व पुरुषांना तासन तास रांगेत उभे राहावे लागते . प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक २४ ला दुपारी 12 ते 2 वाजता च्या सुमारास एक वृद्ध महिला पैसे काढण्यासाठी रांगेत वाट पाहत होती तिचा नंबर येताच लंचब्रेक झाल्याचे वृद्ध महिलेला समजले असता वृद्ध महिलेने ओळखीचे असलेले सामाजिक कार्यकर्ता राहुल सिंग यांना सांगितले ” कि माझं डायबेटीस लेव्हल वाढले आहे “मला चक्कर येत असल्याचे सांगितले अस ऐकताच सामाजिक कार्यकर्ते राहुल सिंग यांनी बैंक मॅनेजर गोपाल डोंगळी याना विनंती केली असुन पंजाब नेशनल बैंकेच्या कर्मचार्यांनी केलेल्या रशीद बुक वर खून करून व टोकन देऊन ही महिलेस उपस्थित राहण्यास हट्ट करत वाद घालू लागले मनुष्यबळ असून ही सिनियर सिटीझना त्रास का ? बैंक कर्मचारी नेहमी जेष्ठ नागरिकांना कडे दुर्लक्ष करतात रांगेत असलेले जेष्ठ नागरिकांना साठी पाण्याची व बसण्याची सोय ही करू शकत नाही असाच सवाल? उध्दभऊ लागला आहे.
सामाजिक कार्यकर्ते राहुल सिंग यांचा सांगण्या नुसार बँक मॅनेजर गोपाल डोंगळी यांची ग्राहका विषयी गैर वर्तुणूक मला आहे . त्याचा मुजोरीचा अनुभव आहे मी त्यांची रीतसर ऑनलाइन तक्रार मुख्यप्रबंध यांचा कडे करणार आहे . असे राहुल सिंग यांनी सांगितले .