*नागपुर ग्रामीण क्राईम डायरी*

*नागपुर ग्रामीण क्राईम डायरी*

*कुख्यात गुन्हेगार जयसिंग यादव याला ठोकल्या बेडया*

*स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीस पथकाची कार्यवाही*

स्था.ग.शा . :- दि . 05/03/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथे गोपनिय बातमीदाराने खात्रीशिर माहिती दिली की , पोलीस स्टेशन कन्हान येथे दाखल गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी जयसिंग यादव हा आकाशवाणी चौक , सिव्हील लाईन्स् , नागपूर येथे एका चहाच्या टपरीवर चहा पिण्याकरीता थांबलेला आहे व त्याने पांढरा रंगाचा हाफ बाहीचा शर्ट व काळया रंगाची फुलपॅन्ट परिधान केलेली आहे . प्राप्त खबरेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल जिट्टावार यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते यांचे पथकास कुख्यात जयसिंग यादव याला ताब्यात घेण्याकरीता रवाना केले . स्था.गु.शा. येथील पथकाने अतिशय शिताफीने आकाशवाणी चौक येथील चहाच्या टपरीवर सापळा रचून कुख्यात गुन्हेगार जयसिंग असरफिलाल यादव , वय 39 वर्ष , रा . चोरबाहुली तह . रामटेक जि . नागपूर याला ताब्यात घेतले . कुख्यात जयसिंग यादव याचे विरुध्द दाखल असलेल्या गुन्हयाची हकिकत अश्याप्रकारे आहे की , दि . 08 एप्रिल 2013 मध्ये कन्हान येथील नाका नंबर 7 जवळ कुख्यात गुन्हेगार मोनिश रेड्डी याचेवर त्याचे परस्परविरोधी टोळीतील काही कुख्यात गुन्हेगारांनी देशी पिस्तूलाने गोळीबार करुन त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता . या घटनेची कन्हान पोलीसांकडून दखल घेवून कुख्यात गुन्हेगार 1 ) योगेश यादव , 2 ) राजा यादव , 3 ) विपीन गोंडाने , 4 ) जयसिंग यादव , 5 ) उमेश भोयर , 6 ) जिवन ठवकर आणि 7 ) प्रशांत येलेकर यांचेविरुध्द पोलीस स्टेशन कन्हान येथे गुन्हा रजि.नं. 22/2013 कलम 307 , 143,147,148,149,109 भादवि सहकलम 3 , 25 आर्म अॅक्ट अन्वये गुन्हयाची नोंद करण्यात आली होती . जयसिंग यादव आणि मोनिश रेड्डी यांनी आपआपली स्वतंत्र टोळया तयार केल्या होत्या त्यामुळे त्यांचेमध्ये अवैध धंदयांचे जुने वैमनस्यामधून टोळी युध्द सुरु होते . जयसिंग यादव व्यतिरीक्त यातील सर्व आरोपीतांना त्यावेळी गुन्हयात अटक करण्यात आली होती . परंतू कुख्यात जयसिंग यादव याल कायदयाच्या कचाटयातून पळ काढण्याचा मार्ग चांगलाच ठाऊक होता . त्याने त्याकालावधीत मा . उच्च न्यायालय , खंडपिठ नागपूर येथुन तात्पुरता अंतरिम जामीन मिळविला होता . परंतू त्याने पोलीसांना तपासात कुठलेही सहकार्य केले नाही व तो पोलीसांसमोर हजर झाला नाही , त्यामुळे त्याचा अंतरिम जामीन मा . उच्च न्यायालयाने खारीज केला होता . सदर बाब जयसिंग याला माहिती पडताच तो फरार झाला होता . तेव्हापासून कन्हान पोलीस सतत त्याच्या शोधात होते . परंतू कुख्यात जयसिंग यादव हा सुमारे 8 वर्षापासून कन्हान पोलीसांना गुंगारा देत राहीला . अखेर नगापूर ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे 8 वर्षानंतर त्याच्या मुसक्या आवळून त्यास बेड्या ठोकल्या व पोलीस स्टेशन कन्हान यांचे स्वाधिन केले . सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री . राकेश ओला , अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . अनिल जिट्टावार पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते , पोलीस हवालदार नाना राऊत , पोलीस नायक दिनेश आधापूरे , पोलीस शिपाई अमोल वाघ , विपीन गायधने , प्रयण बनाफर , महिला पोलीस नायक नम्रता बघेल आणि चालक सहा.फौजदार साहेबराव बहाळे पोलीस नायक अमोल कुथे यांचे पथकाने केली . ( सदर बातमीचा फोटो सोबत जोडला आहे . )
[3/6, 9:58 AM] वीजय पांडे: खून पो.स्टे . मौदा अंतर्गत 12 कि . मी अंतरावर कुंभारपुर शेतशिवार येथे दिनांक 04/03/2021 चे 16.30 वा . दरम्यान फिर्यादी नामे- अजय भोसवराव वडे , वय 40 वर्ष , रा . कोपरा , ता . मौदा हे आपल्या शेतात 10.00 वा . त्यांचा सालगडी गजानन सोबत शेतात आले असता अंदाजे 16.30 वा . दरम्यान बाजुच्या शेतामधुन एक स्त्री चे जोरात ओरडण्याचा आवाज आला . त्यामुळे फिर्यादी व त्याचा मित्र त्या दिशेन धावत गेले असता , समोरील बाजुच्या शेतामध्ये आरोपी नामे अभय दिवाकर येसकर , वय 32 वर्ष , रा . कुभांपुर ता . मौदा याने त्यांना जोराने ओरडुन म्हणाला की , “ साल्यांनो इकडे येवु नका नाही तर तुम्हाला पाहुन घेईन . ” त्यावेळेस आरोपीचे हातात कु – हाड होती . त्याने त्याची पत्नी सौ . कांचन अभय येसकर , वय 26 वर्षे , हिच्या डोक्यात कु – हाड घातल्याने ती जोरात मेलो असे म्हणुन शांत झाली . तेव्हा फिर्यादी हे घटनास्थळावर आले तेव्हा त्यांनी पाहिले की , आरोपीची पत्नी सौ . कांचन ही मृत अवस्थते आढळुन आली . सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे . मौदा येथे आरोपीविरुध्द कलम 302 भादंवि . अन्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीला अटक करण्यात आली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री . विजय जाधव 9870328904 हे करीत आहे .

 

*खून*

पो.स्टे . मौदा अंतर्गत 12 कि . मी अंतरावर कुंभारपुर शेतशिवार येथे दिनांक 04/03/2021 चे 16.30 वा . दरम्यान फिर्यादी नामे- अजय भोसवराव वडे , वय 40 वर्ष , रा . कोपरा , ता . मौदा हे आपल्या शेतात 10.00 वा . त्यांचा सालगडी गजानन सोबत शेतात आले असता अंदाजे 16.30 वा . दरम्यान बाजुच्या शेतामधुन एक स्त्री चे जोरात ओरडण्याचा आवाज आला . त्यामुळे फिर्यादी व त्याचा मित्र त्या दिशेन धावत गेले असता , समोरील बाजुच्या शेतामध्ये आरोपी नामे अभय दिवाकर येसकर , वय 32 वर्ष , रा . कुभांपुर ता . मौदा याने त्यांना जोराने ओरडुन म्हणाला की , “ साल्यांनो इकडे येवु नका नाही तर तुम्हाला पाहुन घेईन . ” त्यावेळेस आरोपीचे हातात कु – हाड होती . त्याने त्याची पत्नी सौ . कांचन अभय येसकर , वय 26 वर्षे , हिच्या डोक्यात कु – हाड घातल्याने ती जोरात मेलो असे म्हणुन शांत झाली . तेव्हा फिर्यादी हे घटनास्थळावर आले तेव्हा त्यांनी पाहिले की , आरोपीची पत्नी सौ . कांचन ही मृत अवस्थते आढळुन आली . सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे . मौदा येथे आरोपीविरुध्द कलम 302 भादंवि . अन्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीला अटक करण्यात आली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री . विजय जाधव 9870328904 हे करीत आहे .

 

*रेती चोरी करणाऱ्या आरोपी अटक*


पो . स्टे . खापा अंतर्गत 09 किमी अंतरावर कोच्छी शिवार कन्हान नदीचे पात्र येथे दिनांक 04/03/2021 चे 16 . 00 वा . ते 17.00 वा . दरम्यान विना क्रमांकाचा ट्रैक्टर व एमएच -40 / ए -521 क्रमांकाची ट्रॉलीचा चालक आरोपी क्र 1 ) अशोक नेमचंद वाघमारे , वय 43 वर्ष , रा . कोच्छी , एमएच -40 / ए.यम -350 क्रमांकाचा ट्रैक्टर व विना कमाकाची ट्रॉलीचा चालक 2 ) मेघलाल फुलचंद वरखडे , वय 31 वर्ष , रा . कोच्छी व एमएच- 40 / एल- 7074 कमाकाचा ट्रैक्टरचा चालक आरोपी क . 3 ) भावराव शेश्राव शालु , वय 22 वर्ष , रा . बावनगाव यांनी त्यांच्या ताब्यातील वाहनात विना परवाना अवैधरित्या एकुण 2 ब्रास रेती किं . 6,000 / – रू . रेती भरून वाहतुक करतांना मिळुन आले . तीन्ही वाहनासह एकुण 15,06,000 / -रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . सदर प्रकरणी सरतर्फे पोलिस गंगाधर ठाकरे यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे . खापा येथे आरोपीविरुध्द कलम 379 , 109 , 511 , 34 भादंवि . कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीतांना अटक आहे . गुन्हयाचा पुढील तपास पोनि श्री मानकर हे करीत आहे . 2 ) पो . स्टे . पारशिवनी -अंतर्गत 07 किमी अंतरावर मौजा दहेगाव जोशी येथे दिनांक 04/03/2021 चे 07.20 वा . ते 07.50 वा . दरम्यान आरोपी क . 1 ) प्रमोद उर्फ मुकेश मोरेश्वर बोरकर वय 33 वर्ष रा . दहेगाव जोशी ( चालक / मालक ) , 2 ) चंदु इश्वर हले वय 35 रा . दहेगाव जोशी ( मालक ) , 3 ) आशिष लक्ष्मण सुरकार वय 20 रा . दहेगाव जोशी ( चालक ) व मालक हे त्याचे मालकीचे ट्रैक्टरला जोडुन असलेल्या ट्रॉलीमध्ये कन्हान नदीचे पात्रातुन अवैधरीत्या रेती उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आले . आरोपीतांच्या ताब्यातुन 1 ) एक महिंद्रा युवो ट्रैक्टर मुंडा क . एम . एच -40 / बी.एम- 1675 किं . 5,00,000 व ट्रॉली एम.एच- 40./एम- 2557 किं . 1,00000 एक बास रेती कि . 3,000 / -रू . 2 ) एक जॉन डिरे ट्रैक्टर क्रमांक एम.एच. 40 / बी.जे . 3505 किं . 6,00,000 / -रू विना क्रमांकाची ट्रॉली किं . 10,0000 / -रू . व एक बास रेती किं . 3,000 असा एकुण दोन्ही वाहनसह 13,06,000 / -रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . सदर प्रकरणी सरतर्फे पोलिस नाईक संदीप कडु पो.स्टे . पारशिवनी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे . पारशिवनी येथे आरोपीविरुध्द कलम 379 , 34 भादंवि . कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीतांना अटक करण्यात आहे . गुन्हयाचा पुढील तपास पो.उप.नि. संदीपान उबाळे पो.स्टे.पारशिवनी मो.क. 7498179174 हे करीत आहे.

 

*जबरी संभोग*


पो.स्टे . कोंढाळी – दि . 03/03/2021 चे 11.00 वा . ते 11.15 वा . फिर्यादी यांची 10 वर्षीय पिडीत मुलगी हिला यातील आरोपी नामे- प्रशांत बाळकृष्ण गजभिये , वय 20 वर्ष , रा . रिंगनाबोळी , ता . काटोल जि . नागपूर याने तिला पैसे देवुन ब्लेड आणायला पाठविले . पीडितेने ब्लेड आणल्यावर आरोपीने तिला त्याच्या घरी बोलावले नेहमीप्रमाने ती त्याच्या घरी गेली तेव्हा घरी कोणीही नाही अशी वेळ साधुन आरोपीने एकांताचा फायदा घेत त्याने पीडित मुलगी हिच्या सोबत बळजबरीने लैंगीक अत्याचार केला . सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे . कोंढाळी येथे आरोपीविरुध्द कलम 354 ब , 376 ( 2 ) ( फ ) , 376 ( 2 ) ( 5 ) , 376 ( अ ) ( ब ) भादंवि . सहकलम 4,6,8 बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीला अटक करण्यात आली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री . विश्वास पुल्लवर 9130149548 हे करीत आहे . अपघातात मृत्यु 1 ) पो.स्टे . मौदा : – अंतर्गत महालगाव शिवार येथे फिर्यादी नामे- धनराज वसंत राउत , वय 40 वर्ष , रा . कढोली हा ऑरेज सिटी प्लावुड कंपनी महालगाव येथे 10 वर्षा पासून काम करतात . फिर्यादी सोबत राम अशिष चंद्रदेव भारदाज ( मृतक ) वय 44 वर्ष जि . बलिया यूपी ह.मू.ऑरेज सिटि हे 10 वर्षा पासून हा काम करीत आहे . दि . 03/03/21 चे 20.30 वा दरम्यान फिर्यादी व किष्णकुमार गजानन भूसे असे दोघेही कंपनीमध्ये हजर असतांना कंपनीच्या समोरील एनएच . 53 नागपूर ते भंडारा रोडवर राम अशिष भारदार हा पारधी पेट्रोलपंप जवळील धाब्यावरुन जेवन करुन पायदळ ऑरेंज सिटि कंपनीकडे येत असता महालगाव शिवार एन.एच 53 नागपूर वरुन भंडारा कडे जाणाऱ्या रोडवर ट्रक क एम . एच- 49 / एटि -7191 चे चालक आरोपीने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून पायदळ रोड कास करणारा राम अशिष चंद्रदेव भारदाज यांना धडक मारल्याने अपघातात ते गंभीर जखमी होवून जागीच मरण पावला . सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे . मौदा येथे आरोपी चालकाविरुध्द कलम 279 , 304 ( अ ) भादवी . सहकलम 184 मोवाका कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि श्री मोहोड मो . न . 9823910156 हे करीत आहे . 2 ) पो.स्टे . कुही : – अंतर्गत 7 कि . मी . चिपडी येथे आरोपी / मृतक नामे- विलास मधुकर कांबळे , वय 35 वर्ष , रा . कैलास नगर मातामंदीर जवळ अर्पाटमेंट नागपूर हा दि . 05/02/2021 रोजी मांढळ वरून नागपुर कडे 17.30 वा . सुमारास हा त्याचे एमएच -49 / एजी- 7570 क्रमांकाच्या मोटरसायकल जात असता चिपडी गावा समोरील रोडवर डुक्कर अचानक आडवा आल्याने त्याचा बाईक वरून तोल सुटल्याने वाहन अंनियत्रीत होवुन अपघात झाला . या अपघातात गाडीवर त्याचा मित्र राकेश तबाने ( पटवारी ) हा पाठीमागे बसला होता . तो किरकोळ जखमी झाला तर मोटरसायकल चालक विलास कांबळे हा गंभीर जखमी झाला . त्यास उपचाराकामी प्राथम सेंट्रल इंडीया कारडीयोलोजी इंस्टीस्टयुट सावरकर नगर नागपुर व दि . 24/02/2021 पर्यंत उपचारा करून त्याची प्रकृती दुरूस्त न झाल्याने दि . 24/02/2021 रोजी 20.49 वा . ऑरेज सिटी हॉस्पीटल येथे रेफर केले . त्याचा उपचार चालु असतानी दि . 26/02/2021 ला संध्याकाळी 06.12 वा . डॉक्टरानी तपासुन मृत घोषीत केले . सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे . कुही येथे आरोपी चालकाविरुध्द कलम 279 , 304 ( अ ) भादंवी . सहकलम 184 मोवाका कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . गुन्हयाचा पुढील तपास मपोउपनि तकीत मो.न. 8766964595 हे करीत आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …