*तायवाडे महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावर आभासी पद्धतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन*

*तायवाडे महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावर आभासी पद्धतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- तायवाडे महाविद्यालय महादुला-कोराडी व मटेरियल सायन्स सोसायटी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने *” राष्ट्रीय विज्ञान दिवस 2020 -2021″* चे तायवाडे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाडून राष्ट्रीय स्तरावर आभासी पद्धतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रश्नमंजुषा स्पर्धेत संपुर्ण भारतातून ११८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यातून ५६० विद्यार्थ्यांनी या प्रश्नमंजुषा स्पर्धे मध्ये आभासी पद्धतीने सहभाग घेतला .या प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कु. शालिनी शाहू भिलाई महिला महाविद्यालय हेमचंद यादव विद्यापीठ छत्तीसगड हिला तर दुसरा क्रमांक कु. अनुष्का जुमळे डॉ. आंबेडकर महाविद्यालय नागपूर व कुमारी आचल राऊत श्री शिवाजी महाविद्यालय अकोला तर तिसरा क्रमांक कु. दिबिना दिनकरण शिवाजी विज्ञान महाविद्यालय नागपूर व कु .धनश्री ठाकरे सिटी प्रीमियर कॉलेज नागपूर यांना मिळाला पारितोषिक पटविणार -या विद्यार्थिनींना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे,.एस.पी .एम.एस .चे अध्यक्ष डॉ.एस.एस.उमरे ,एस.पी .एम.एस.चे सचिव डॉ.डब्ल्यू.बी.गुरनूले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रश्नमंजूषा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत भास्कर सहाय्यक प्राध्यापक डॉ. डी. एम. चापले व डॉ.पी.बी. थोरात यांनी मोलाचे सहकार्य केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …