*मंत्री सुनील केदार यांनी घेतली कोरोनाची लस*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
नागपुर : मंत्री सुनील केदार यांनी आज नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय( मेडिकल) येथे जागतिक महामारी कोरोना या रोगावरील प्रतिबंधात्मक लस घेतली. ही लस संपूर्णपणे सुरक्षित आहे. माझ्या समस्त जनतेला निवेदन आहे की, आपण सर्वांनी ही कोरोना प्रतिबंधात्मक लस घेऊन कोरोना या रोगाला हद्दपार करावे व आपल्या व आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठेवावे.
लसीबद्दल आजही अनेक लोकांच्या मनात काही गैरसमज असल्याचे दिसून येते, परंतु हि लस अतिशय सुरक्षित असून सर्वांनी लस घ्यावी ही कळकळीची विनंती.
लसीकरणानंतरही मास्क वापरणे, शारिरीक अंतर व हातांची स्वच्छता राखणे यांसारख्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आपल्या सर्वांना करावे लागणार आहे.