*वराडा येथे कोरोना चा विस्फोट होऊन ३५ रूग्ण आढळल्याने परिसरात खळबळ*
*वराडा गावात एकुण ८९ कोरोना बाधित*
*कोरोना प्रति बंधात्मक उपाय योजना नियमाची काटेकोर पणे पालन करा – तहसीलदार वरुण कुमार सहारे*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – साटक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उप केंद्र वराडा गावात (दि.१२) ला १६ रूग्ण आढळल्याने (दि.१३) मार्च ला शिबीर लावुन रॅपेट ८२ चाचणीत २३ रूग्ण आढळले तर कन्हान व खाजगीतुन ३ आज (दि.१५) ला रॅपेट ८० व स्वॅब ८० चाचणी घेण्यात आल्या यात रॅपेट ८० तपासणीत वराडा चे ३५ रूग्ण आढळुन वराडा गावात ५४ + ३५ असे ८९ कोरोना रुग्ण झाल्याने वराडा कोरोना हॉटस्पाट होत असुन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
साटक प्राथमिक आरोग्य केंदाचे उपकेंद्र असलेले वराडा गावात ३१ डिसेंबंर २०२० ला २० रूग्ण असुन साटक केंद्रात ७८ रूग्ण संख्या होती. ४ मार्च २०२१ ला वराडा २ रूग्ण आढळुन २२ रूग्ण तर साटक केंद्र ८६ रूग्ण संख्या होती.(दि.८) मार्च ला गावच्या सरपंचा सह दोन असे तीन रूग्ण व (दि.९) च्या स्वॅब चाचणीत एक महिला ग्रामपंचायत पंचायत सदस्या असे वराडा एकुण ३१ रूग्ण संख्या झाली. (दि ११) ३३ संख्या असुन शुक्रवार ला वराडा येथील ४९ तपासणीत १६ रूग्ण आढळुन ४९ रूग्ण तर साटक केंद्र १३१ रूग्ण संख्या झाली होती. शनिवार (दि.१३) मार्च ला ग्राम पंचायत भवनात प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे शिबीर लावुन रॅपेट ८२, स्वॅब ९७ एकुण १७९ चाचणी घेण्यात आल्या यात रॅपेट ८२ तपास़णीत वराडा चे २३ रूग्ण आढळुन वराडा एकुण ७२ रूग्ण तर साटक केंद्र १५४ रूग्ण संख्या झाली आहे. कन्हान व खाजगी तपासणीत ३ रूग्ण आणि सोमवार (दि.१५) ला रॅपेट ८० व स्वॅब ४५ असे १२५ तपासणी करण्यात आल्या. यात रॅपेट ८० तपासणीत ३५ रूग्ण आढळुन वराडा एकुण ११० रूग्ण संख्या झाली असुन २० रूग्ण बरे झाले ८९ रूग्ण बाधित असुन २ मुत्युची नोंद आहे. वराडा गावात आज (दि.१५) ला सध्या ८९ रूग्ण बाधित असल्याने वराडा गाव हॉटस्पाॅट झाले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ प्रज्ञा आगरे आरोग्य टेक्नीशियन शालीकराम ऊईके, सायली शेळकी, आरोग्य परिवक्षक अशोक सोनटक्के, दामोधर ठोंबरे, नंदकिशोर डोईफोडे, मंगेश खोडे, उषा चव्हाण, प्रेरणा घोटेकर, कल्पना निमकर, सिंधुताई वाढई, शांताबाई धुर्वे आदी रूग्णाच्या सेवेत परिश्रम करित आहेत. ग्राम पंचायत व्दारे फवारणी करून सॅनिटायझेशन करण्यात आले.
पारशिवनी तहसिलदार वरूणकुमार सहारे, तालुका कोरोना विभाग प्रमुख डॉ अन्सारी हयानी गावात भेट देऊन गाव बंदी करण्यात आली. गावक-याना आपली व कुंटुबाची काळजी घेत कोरोना प्रति बंधात्मक उपाय योजना नियमाची काटेकोर पणे पालन करण्याचे आवाहन केले.