*लग्नसराईत कोरोना होत नाही का?*
*शासनाचा नियमचे सरासर उलंघन*
वरोरा प्रतिनिधि – मुजम्मील शेख
वरोरा – मागील वर्षभरापासून कोरोना चा कहर सुरूच आहे .परंतु महत्वाच्या कामाना कोरोनाच्या प्रतिबंधातून सूट देण्यात आली आहे .वरोरा शहरातील वेगवेगळ्या मंगल कार्यालयात लग्न सुरू आहे यात दिलेल्या परवानगी पेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती असताना देखील प्रशासनाकडून कारवाई होताना दिसत नाही .गुप्त महीती च्या नुसार काही मंगल कार्यालयाच्या मालकांकडून कारवाई न करण्यासाठी देखील स्थानिक प्रशासनास काही रक्कम देत असल्याची चर्चा सुरू आहे . कोरोना कायमचा संपवायचा की आपले वसुलीसाठी कोरोनाच्या नियमाला फाटा द्यायच्या ते प्रशासन ठरवतील.