*वर्धा-नागपुर जिल्ह्याच्या (वर्धा जिल्ह्वयात) सीमेवर अवैध दारू गाळप केंद्र*
*सेलू-वर्धा येथे अवैध दारू पुरवठा!*
*पालकमंत्री व पोलिस अधिक्षकांकडे तक्रार*
कोंढाळी प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे
नागपूर – वर्धा जिल्ह्याचे सीमेवरील धोतीवाडा येथील अवैध दारू गाळप करणार्यावर नागपुर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशन चे अधिकारीकार्यांनी धाडी घालवू धोतीवाडा येथील विक्की ढोके च्याअड्यावर धाडी घातल्या आहेत तर आता त्यांचे सहकार्याने सीमे लगतच्या वर्धाजिल्य्ह्यातील सेलू पोलीस स्टेशन अंतरगत येणार्या गरमसूर या गावचे सीमे लगत चे नाल्याच्या काठावर स्थानिय शेतकर्यां कडून पाणी पुरवठा घेऊन अवैध दारू भट्या चालविल्या जात आहे.
या प्रकरणी सेलू पोलीसांना माहीती नसावी?यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. तर गरमसुर येथील पोलीस पाटील यांना विश्वासात घेऊन येथील अवैध दारू गाळप केंद्रावर योग्य कार्यवाही ची अपेक्षा स्थानिय नागरिकांची आहे.
या बाबद माहिती अशी की वर्धा – नागपुर जिल्ह्याच्या सीमेला व.जंगल प्रवण क्षेत्राचा फायदा घेत धोतीवाडा येथील अवैध दारू गाळप करनारे यांनी आपला मोर्चा आता वर्धा जिल्य्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गरमसुर या गावालगत च्या नाल्याच्याकाठावर राजेरोस पणे अवैध दारू गाळप सुरू असुन या कडे सेलू पोलीस याकडे दुर्लक्ष कां करत आहे हा प्रश्न चर्चेचा येत आहे. या बाबद ची तक्रार समाज माध्यमाने करन्यात आल्याची माहीती आहे.