*सिंगारदिप रेती घाट बंद करण्यासाठी गावकर्यांनी केले आंदोलन*
*रेतीच्या वाहतुकीमुळे गावाचा एकमेव रस्ता, पिण्याची पाईप लाईन, व शाळाच्या विद्यार्थांना झाला धोका निर्माण.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – सिंगारदिप गाव हे कन्हान नदीला आलेल्या महापुराने आदिच भयंकर नुकसान झाले असता जिल्हाधिकारी यांनी सिंगारदिप रेती घाट लिलाव करून सुरू केल्याने रेतीची वाहतुक ट्रॅक्टर, ट्रकने घाटधारक करित असल्याने गावाचा एकमेव डांबरी रस्ता, पिण्याची पाईप लाईन, प्रदुषण, शाळेच्या मुले व गावकर्यांना धोका निर्माण झाल्याने गावकर्यांनी हा रेतीघाट बंद करण्याकरिता शनिवार पासुन आंदोलन सुरू केले आहे.
कन्हान- तारसा रोड वरून दक्षिणेस ३ किलो मीटर लांब कन्हान नदी काठावर बसलेल्या सिंगारदिप गावा ला एकमेव डांबरी रस्ता असुन दिनांक २९ व ३० ऑगस्ट ला पेंच धरणाच्या पाण्याच्या विसर्गाने महापुर आल्याने गावाचा २ किलो.मीटर.परिसर पाण्याने व्यापुन गावाचा संपर्क तुटला होता. या महापुराने गावाचे व गावकर्यांचे भयंकर नुकसान झाले होते. आपातकालीन सकंटातुन गावाचे पुर्वसन करण्याचे सोडुन मा.जिल्हाधिकारी मार्फत सिंगारदिप रेती घाटाचा लिलाव करून सुरू करण्यात आल्याने रेतीघाट धारका द्वारे ट्रॅक्टर, ट्रकने नदीतुन रेती वाहतुक सुरू केल्याने गावाचा एकमेव डांबरी रस्ता, पिण्याची पाईप लाईन, शाळेच्या विद्यार्थांना व गावकर्यांना धोका निर्माण झाला . तसेच प्रदुषणाने आरोग्यास सुध्दा अपायकारक होऊ शकतो . या करिता हा रेती घाट रद्द करून बंद करण्यात यावा म्हणुन गावकर्यांनी रस्त्यावर बैलबंडी आडवी लावुन रस्त्यावर बसुन शनिवार दिनांक २० मार्च पासुन आंदोलन सुरू केले आहे.
सोमवार दिनांक २२ मार्च ला सिंगारदिप आंदोलन स्थळी स्थानिय आमदार आशिष जैस्वाल यांनी भेट देऊन संबधित अधिकार्यांना फोन वर बोलुन रेती घाटास गावास व गावकर्यास धोका निर्माण होत असेल, गाव कर्यांचा विरोध असेल तर हा रेती घाट रद्द करण्यात यावा. याविषयी मी पत्र सुध्दा देतो म्हणुन ग्रामस्थांना आश्वस्त केले.
प्रहार जनशक्ती जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे यांनी सिंगारदिप गावकर्यांचे हितार्थ हा रेती घाट त्वरित बंद करण्यात यावा. तहसिलदार व पोलीस निरिक्षक गावकर्यांचे संरक्षण करण्याचे सोडुन घाटधारकांची बाजु घेऊन धमकावित असेल तर लोकशाही च्या मार्गाने तहसिल कार्यालयात पाचसे लोकांसह धरणे आंदोलन करु असा इशारा दिला आहे.
सिंगारदिप गावाचे व गावकर्यांचे हित जोपासण्याकरिता सिंगारदिप रेती घाट त्वरित रद्द करून बंद करण्याची मागणी ग्राम पंचायत बोरी (सिंगारदिप) उपसरपंचा शुंभागी टोहणे, ग्रामपंचायत सदस्य अनिल कुथे, पुरूषोत्तम ईखार, उषा दोडके, माजी उपसरपंच अशोक टोहणे, पाडुरंग मोहोड नानेश्वर दोडके, राजेश सावरकर, विष्णु कुथे, पाडुरंग दोडके, क्रिष्णा कुथे, दिपक टोहणे, रविंद्र कुथे, बिसन भुरे, राधेश्याम दोडके, पुरूषोत्तम दोडके, अकुंश भुरे, बाबा अवझे, हिरामण दोडके, महादेव कुथे, गुंडेराव दोडके, गोविंदा टोहणे, संगिता दोडके, सविता दोडके,भाग्यश्री टोहणे, जयश्री दोडके, माया दोडके, मंगला दोडके, शालु दोडके, वनिता दोडके, अनिता दोडके, छाया अवझे, प्रियंका दोडके, दुर्गा अवझे, रूखमा दोडके, सेजल अवझे, दुर्गा दोडके, पुर्वा अवझे, समिक्षा दोडके सह आदि गावकर्यांनी धरणे आंदोलन करून रेती वाहतुक बंद केली.