*फुललेला, फळलेला हा विद्यापीठरूपी वृक्ष समाजासाठी कल्पवृक्ष ठरो* -डॉ .उमा वैद्य

*फुललेला, फळलेला हा विद्यापीठरूपी वृक्ष समाजासाठी कल्पवृक्ष ठरो*-डॉ .उमा वैद्य

रामटेक प्रतिनिधि – किरण मर्जिवे 

*कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयात  स्थापना दिनाचा कार्यक्रम थाटात संपन्न*      

*रामटेक  –माझ्या  डोळयासमोरच्या प्रतिमेपेक्षाही प्रत्यक्ष स्वरूप अधिक उत्कट, सुंदर आहे. लक्ष्मी आणि सरस्वती यांचा अपूर्व संगम येथे झाल्याचे दिसून येते. बीजस्वरूपात लावलेला आणि आज फुललेला, फळलेला हा विद्यापीठरूपी वृक्ष समाजासाठी कल्पवृक्ष ठरो, अशा भावपूर्ण शुभेच्छा कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या पूर्वकुलगुरू राष्टंपती पुरस्कार प्राप्त संस्कृत विदुषी डॉ. उमा वैद्य यांनी दिल्या.*

*कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयाच्या रामटेक मुख्यालयात नुकताच  स्थापना दिनाचा कार्यक्रम पार पडला, याप्रसंगी ते बोलत होते. प्रो. श्रीनिवास वरखेडी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रगीत आणि विश्‍वविद्यालय गीत सामूहिकरीत्या म्हणण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी होते. व्यासपीठावर कुलसचिव प्रो. विजयकुमार, सर्व अधिष्ठाता व संवैधानिक अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.*

*कार्यक्रमाचा प्रारंभ अमित भार्गव यांच्या वेदमंत्राघोषात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाला. प्रज्ञा करकरे हिने सरस्वती स्तवन आणि विश्‍वविद्यालय गीत सादर केले. भारत कॉलेज ऑफ फाईन आर्टस अँड कल्चर, मुंबई या संस्थेच्या चित्रा दळवी यांनी संस्कृत शिवस्तुतीवर भरतनाट्यम सादर केले. प्रास्ताविक कुलसचिव प्रो. विजयकुमार यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात प्रो. विजयकुमार यांनी विद्यापीठाच्या स्थापनेचा इतिहास, सद्य: प्रगती आणि भविष्यातील योजना व आव्हाने यांचा सविस्तर आढावा घेतला.*

*कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रो. श्रीनिवास वरखेडी यांच्या शुभहस्ते प्रमुख अतिथी डॉ. उमा वैद्य यांचा शाल, श्रीफळ, देवून तर संस्कृत तथा संस्कृतेतर भाषा संकायाच्या अधिष्ठाता प्रो. नंदा पुरी यांनी साडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संचालन सुमीत कठाळे यांनी केले, तर आभार सहाय्यक कुलसचिव कल्याणी देशकर यांनी मानले. वंदे मातरम्ने कार्यक्रमाची समाप्ती झाली. विविध पुरस्कारांची घोषणा छात्रा कल्याण संचालक डॉ. जयवंत चैधरी, सुमीत कठाळे, डॉ.  रेणुका बोकारे यांनी केली.*
*याप्रसंगी विश्‍वविद्यालयातील सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेत्तर सहकारी, पुरस्कारप्राप्त विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, पुरस्कारप्राप्त विद्यार्थी, पालक, रामटेकचे गणमान्य नागरिक, पत्रकार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …