लवकरात लवकरच गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणार- आ. बच्चू कडू

लवकरात लवकरच गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणार- आ. बच्चू कडू

 

कुही शहरसंपूर्ण महाराष्ट्रातील अपक्ष लोकप्रिय आमदार म्हणून ख्याती प्राप्त असलेले नवस्थापित “प्रहार जनशक्ती पक्षाचे” संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज कुही शहराला धावती भेट दिली यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष कुही च्या वतीने त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्याच्यासोबत प्रहारचे कामगार नेते बाळकृष्णजी जुवार हे प्रामुख्याने उपस्थित होते .
आपल्या भाषणात बच्चू कडू यांनी निवडणूक झाल्यावर लवकरात लवकर गोसेखुर्द चा मुद्दा पुन्हा उचलून धरणार व सर्व प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळवून देणारा अशी ग्वाही दिली, तसेच कुही शहरातील अपंग बांधवांना मिळत असलेली दुय्यम प्रकारची वागणूक यावरही एक मोठे आंदोलन उभारून न्याय देणार असेही यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. या धावत्या भेटीचे आयोजन तालुका अध्यक्ष संजय अतकरी यांच्या मार्गदर्शनात झाले , कार्यक्रमस्थळी प्रहारचे तालुका संपर्क प्रमुख राजूभाऊ वैद्य , शेषराव दूधपचारे , रोशन बांते , महेश अतकरी, हर्षल चौधरी, प्रतीक झुरमुरे व अनेक महिला व पुरुष प्रहार कार्यकर्ते तथा कुही शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …