*मोठी बातमी !!* *अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा* *कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय*

*मोठी बातमी !!*

*अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा*

*कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय*

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी 15 दिवसात सीबीआयनं पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी झालेल्या आरोपावर निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी न्यायालयाचा आदर म्हणून मी राजीनामा देतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितले. त्याला पवारांनी दुजोरा दिला आहे. ते आता मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारतील असे राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी तसे पत्र लिहित ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दिले होते. दरम्यान, आज (५ एप्रिल) मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे.


*परमबीर सिंह यांच्या आरोपाची चौकशी राज्य सरकार करणार*

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची चौकशी करण्याचा महत्त्वाचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. आता या आरोपांच्या चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती सहा महिन्यात या प्रकरणाचा अहवाल देणार आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …