*चला उभारु पक्ष्यांसाठी पाणपोई, खाद्य पात्राच्या गुढ्या*

*चला उभारु पक्ष्यांसाठी पाणपोई, खाद्य पात्राच्या गुढ्या*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – ग्रामोन्नती प्रतिष्ठान कन्हान द्वारे पर्यावरण संरक्षण सेवाभावी मोहीम अंतर्गत प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कांन्द्री-माईनच्या प्रांगणातील वृक्षा वर पक्ष्यांसाठी पाणपोई, खाद्य पात्राच्या गुढया उभारण्यात आल्या.


तप्त उन्हाळात पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. यात पाण्याअभावी अनेक पक्ष्यांचा मृत्यु होतो. कोरोनाचे बंधन लक्षात घेता यंदाचा तप्त उन्हाळा लक्षात घेऊन प्रत्येकाने गुढीपाडवा निमित्ताने पक्ष्यासाठी पाणपोई, खाद्य पात्राच्या गुढया सुरु करण्याचा नवसंकल्प करावा, असे आवाहन प्राचार्य मिलिंद वानखेडे यांनी केले. प्रत्येकाने मानवधर्म जोपा सत तप्त उन्हाळात मुक्या प्राण्यांसाठी व पशु पक्ष्यांसाठी पाणपोई, खाद्य पात्राची गुढी उभारून सुरूवात आपल्या घरातुन करावी.
ग्रामोन्नती प्रतिष्ठान नागपुर मुख्य कार्यालय कन्हान -पिपरी द्वारे प्रमुख उदिष्टे पर्यावरण संरक्षण मोहीम अंतर्गत मंगळवार (दि.६) एप्रिल ला प्रकाश हायस्कूल कांन्द्री – माईन येथील पटागंणातील वृक्षावर पक्षी पाण पोई, खाद्य पात्राच्या गुढया उभारून पर्यावरणा संरक्षणा विषयी जनजागृती करण्यात आली. मानुष्यकी धर्म जोपसण्यास प्रत्येकाने आपल्या घरावर, झाडावर पक्ष्यांकरिता पाणपोई व खाद्य पात्र उभारून दररोज पाणी व खादय टाकुन मौलिक कार्यात सहभागी व्हावे . कार्यक्रमाला प्राचार्य मिलिंद वानखेडे, कांन्द्री येथील ग्रामसेवक नरेंद्र गाडगे, वसंत ठकराले, गणराज उईके, मिलिंद वाघमारे व पालक उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …