*मोठी बातमी*
*कांन्द्री च्या जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात कोरोना मुळे चौघांचा मृत्यु*
*डाॅक्टर , नर्स , बेड्स आॅक्सीजन व इतर कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे ही घटना घडली*
*नागरिकांनी दवाखान्याची केली तोडफोड*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान – कांन्द्री परिससरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यावर ही कांन्द्री च्या जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात डाॅक्टर , नर्स , बेड्स , आॅक्सीजन व इतर कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे आज जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात कोरोना मुळे चौघांचा मृत्यु झाल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली असुन नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात काही वेळा करिता तनावाचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी दवाखान्याची तोड़फोड़ केली आहे . या घटनेचा जिम्मेदार कौन ? असा प्रश्न उपस्थित झाल्याने दोषियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिक करीत आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री मा.सुनील केदार यांच्या सूचनेवरून जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रश्मी बर्वे आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पारशिवनी तालुक्याचा कांन्द्री येथील वेकोलि च्या जवाहरलाल नेहरू केंद्रीय चिकित्सालयात कोव्हिड -19 सेंटर सुरु केले असुन जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात डॉक्टरांन सह आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आज सकाळ च्या सुमारास कोरामुळे चौघांचा मृत्यु झाल्याने परिसरात काही वेळा करीता तनावाचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी दवाखान्याची तोड़फोड़ केली आहे . जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात ४८ बेड्स असुन ऑक्सिजनचे सिलिंडरही मुबलक प्रमाणात आहेत. पण डॉक्टरांचा प्रशिक्षित स्टाफ नसल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे . जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आजच दोन डॉक्टरांची नियुक्ती केली होती. पण हे दोन डॉक्टर तेथे पोहोचे पर्यंत जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात ले वातावरण चांगलेच खराब झाले हे बघता कुणालाही आपली ओळख न देता दोन्ही डाॅक्टर तिथुन निघुन गेले. व जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात कोरोना मुळे चौघांचा मृत्यु झाल्याने वेकोलिचे डॉक्टर पसार झाल्याने कन्हान पोलिस कर्मचार्यांनी येऊन स्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्या दरम्यान वेकोलिचे डॉक्टरही तेथून पसार झाले .
सोमवार दिनांक १२ एप्रिल ला नेहरू चिकित्सालयात २९ रुग्णांना भरती करण्यात आले असुन त्यांच्या पैकी अमित भारद्वाज (वय ३०), हुकुमचंद येरपुडे (वय ५७), कल्पना कडू (वय ३८) आणि किरण गोरके (वय ४७) यांचा आज सकाळी ८ ते ९ वाचताच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला जात असुन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाहीत ही बाब परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या ही लक्षात आली . त्यामुळे त्यांनी कन्हान – पिपरी नगर परिषद चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांना पाचारण केले पण ते घटनास्थळी आलेच नाहीत. या प्रसंगी कन्हान उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान , परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर , एपीआई सतिश मेश्राम , अमितकुमार आत्राम , नंदा पाटील , कांन्द्री ग्रामपंचायत चे सरपंच चंद्रशेखर पडोळे , टेकाडी ग्रामपंचायत सरपंच सुनिता मेश्राम सह आदि पोलीस कर्मचार्यांनी उपस्थित राहुन परिस्थीती नियंत्रणा करिता सहकार्य केले .
*जर डॉक्टर्स व सुविधा नव्हती तर कोरोना रुग्ण ठेवले कशाला ?*
कांन्द्री च्या जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात बेड्स आणि ऑक्सिजनची व्यवस्था आहे. पण डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवा आहे. ही परिस्थिती काही नवीन नाही. पण खुद्द मंत्र्यांच्आणि या सूचनेवरून जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी येथे कोविड रुग्णालय सुरू केल्यामुळे हे हॉस्पिटल आता सर्व सुविधांनी सुसज्ज होईल. त्यामुळे लोकांमध्ये आनंद होता. पण त्यांचा हा आनंद दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकू शकला नाही आणि आजच ही घटना घडली. सुविधा पुरविणे शक्य नव्हते, तर या दवाखान्यात कोरोना रुग्ण ठेवले कशाला, असा संतप्त प्रश्न लोक विचारत आहेत.
*कुठे गेले जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन ?*
दोन च दिवसांपूर्वी मंत्री सुनील केदार यांनी जवाहरलाल नेहरू चिकित्सालयाची पाहणी केली असता त्यावेळी येथे ऑक्सिजन आणि बेड्सची व्यवस्था करण्याबाबत सांगण्यात आले होते. तात्काळ ऑक्सिजनच्या ६४ बेड्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले होते. पण आज डॉक्टर्स नसल्यामुळेच चौघांची जीव गेला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच विरले.
*या घटने मुळे नगर परिषद प्रशासन जागा होईल काय ?*
कन्हान परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यावर ही नगर परिषद प्रशासना द्वारे शहरात सेनिटाइजर ची फवारणी होतांना दिसत नसुन शहरातल्या बाजार पेठेत नागरिकांची गर्दी दिसुन येत आहे त्यामुळे शहरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत आहे . या घटने मुळे नगर परिषद प्रशासन जागा होऊन शहरात कोरोना चा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता कसली उपाय योजना करतो या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे .