*ब्रेकींग न्युज*
*तहसीलदार सतीश मासाळ यांची सावनेर एम.आई.डी.सी
मध्ये मोठी कारवाई*
*47 प्राणवायू सिलेंडर हस्तगत*
*कोवीड रुग्णां करीता होणार वापर*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः मा. जिल्हाधिकारी साहेबांचे आदेशानुसार सावनेर तालुक्यातील हेटी सुरला एमआयडीसी मधील श्रीधर स्टील कंपनी व काॅनफिडन्स पेट्रोलीयम कंपनीतून त्यांनी कंपनीच्या कामासाठी जीवनआवश्यक प्राणवायूचे साठवून ठेवलेले 47 मोठे (जंबो) सिलेंडर सावनेर चे तहसीलदार सतिष मासाळ यांनी हस्तगत करुण त्यांचा उपयोग सावनेर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाकरिता होणार अहल्याचे स्पष्ट केले.
*मा.जिल्हाधिकारी यांचे कडून प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील हेटी सुरला एमआयडीसीतील श्रीधरस्टील कंपनी व काँनफिडन्स पेट्रोलियम कंपनीत या दोन कंपनीत कंपनीच्या कार्याकरिता एकूण 47 oxygen चे सिलेंडर चा साठा असल्याची माहिती प्राप्त होताच तहसीलदार सतिष मासाळ व त्यांचे अधिनस्थ अधिकारी कर्मचारी यांनी सदर कंपनीतुन वाढत्या कोरोना काळात कोरोना लागन झालेल्या रुग्णांना उपयुक्त असे प्राणवायूचे 47 सिलेंडर ताब्यात घेतले. व सदरचे प्राणवायू सिलेंडर कोविड रुग्णालयाकरीता उपलब्ध करण्यात येणार आहेत.अशी माहीती सावनेरचे तहसीलदार सतिश मासाळ यांनी दीली*
*सदरच्या कारवाईत मंडळ अधिकारी राठोर,तलाठी गणेश मोरे,महसूल सहाय्यक सुजीत आडे आदिंनी सहभाग घेतला*