*ब्रेकिंग न्यूज*
*उद्या संध्याकाळी ८ वाजता पासून राज्यात कड़क संचारबंदी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
*वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद!*
विशेष प्रतिनिधि
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित करत आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू केला जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित केलं. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू केला जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे मुख्यमंत्री आज जनतेशी काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लादले आहेत. राज्यात बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संचारबंदी असणार आहे. या काळात अत्यावश्यक कारणाशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाहीत.
– काय असतील निर्बंध –
काय सुरु – काय बंद
-उद्या संध्याकाळपासून कलम 144 लागू (संचारबंदी)
-आवश्यक काम, अत्यावश्यक नसल्यास घराच्या बाहेर पडता येणार नाही
-सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
-जनावरांशी संबंधित, पाळी प्राण्यांसाठीचे दवाखाने उघडे राहतील
-लोकल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू होणार
-पावसाळ्यातील कामे आधीच करणं गरजेचं आहे. ती कामं सुरु राहतील
-अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद
– बँका, ई कॉमर्स सुरु राहतील
-पेट्रोल, खासगी सुरक्षामंडळे सुरु
-रस्त्यावरच्या विक्रेत्यांना परवानगी आहे. सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत विक्री करता येणार
– औद्योगिक क्षेत्रातील उद्योगधंदे सुरु राहतील
– खतं दुकाने, शेतीसंबंधीत कामे सुरु राहतील
-हॉटेल, बार बंद राहतील, पार्सल सुरु राहतील
-खासगी क्लासेस पूर्णपणे बंद राहतील
-फक्त अत्यावश्यक गोष्टींची ऑनलाईन खरेदी सुरु
– किराणे दुकाने, मेडिकल सुरु राहतील
– सर्व धार्मिक स्थळे बंद राहतील
– राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी
-5 कोरोना रुग्ण सापडलेली इमारत मायक्रो कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित
– लोकल, बस सेवा बंद करणार नाही – मुख्यमंत्री
सरकारने याकाळात काही सुविधा पुरवल्या आहेत
-7 कोटी लोकांना 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ
-शिवभोजन योजना दहा रुपयांची थाळी 5 रुपयांना केली होती, आता मोफत देण्यात येणार
-राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 1500 रुपये अर्थसहाय्य
-घरकाम करणाऱ्या कामगारांना निधी देण्यात येईल
-अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देण्यात येणार आहे.
– गरजूंना 3 किलो धान्य मोफत