*स्मृती भ्रंश दिवस साजरा*
आदासा (सावनेर)-21सप्टेंबर 2019 रोजी भारतीय आदिम जाति सेवक संघ विदर्भ नागपूर द्वारा संचालित मातोश्री वृद्धाश्रम आदासा येथे जागतिक स्मृती भ्रंश दिवस साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी मंचावर उपस्थित मा. डॉ. परेशजी झोपे, वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री प्रदीप चन्दनबटवे तसेच जेष्ठ नागरिक म्हणून श्री. वारकेजी, श्री. पारेखजी, श्रीमती शोभा कन्नाके व वीणाबाई इगतपुरीकर ह्या उपस्थित होत्या. आश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप चन्दनबटवे यांनी जागतिक स्मृतिभ्रंश या दिनाचे महत्व समजून सांगितले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक श्री माननीय डॉक्टर परेश जी झोपे यांनी विस्तृत अशी माहिती वृद्धाश्रमातील सर्व जेष्ठ मंडळींना दिली. तसेच स्मृतीभ्रंश या आजाराची कारणे व त्यावरील उपाय कसे करता येईल याचे सुद्धा विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री राजेश कुमार मालविय व सचिव श्री. प्रमोद खराडे यांनी सर्वांचे आरोग्य सुदृढ राहील अश्या शुभेच्या दिल्यात. कार्यक्रमाचे संचालन आश्रमाचे कार्यकर्ते हरिश्चंद्र सावध यांनी तर आभारप्रदर्शन शरद चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.