*सांगा कसा होणार नाही स्तनदा माता अन् नवजात शिशूंना कोरोना विषाणूचा संसर्ग*
विशेष प्रतिनिधि
वर्धा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्ण तपासणीपासून तर इतर बाह्यरूग्ण, आंतररूग्णांसह सामान्य रूग्णांची उपजिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी असते. आर्वी भागातीलच नव्हेतर इतर तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक रूग्ण तपासणीला येतात. परंतु, डॉक्टरांच्या नजरेआड अनेक वॉर्डांमध्ये मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात नवजात शिशू कक्ष, महिला वार्ड आहे.
नवजात शिशू कक्षात गर्दी, विनामास्क वावर धोक्याचा : रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर, पुरुषांची गर्दी राहत असल्याने स्तनदा मातांना हाेतोय नाहक त्रास
उपजिल्हा रूग्णालयातील नवजात शिशू कक्ष, महिला कक्षासह सामान्य विभागात मोठी गर्दी होत असल्याचे दिसून आले. इतकेच नव्हेतर नवजात शिशू कक्षात पुरुषांचा वावर राहत असल्याने स्तनदा माता आणि नवजात शिशूंना कोरोनाचा धोका होण्याची शक्यता बळावी आहे. मात्र, हे सर्व डॉक्टरांच्या नजरेआड होत असल्याने रूग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर आल्याचे दिसून आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्ण तपासणीपासून तर इतर बाह्यरूग्ण, आंतररूग्णांसह सामान्य रूग्णांची उपजिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी असते. आर्वी भागातीलच नव्हेतर इतर तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक रूग्ण तपासणीला येतात. परंतु, डॉक्टरांच्या नजरेआड अनेक वॉर्डांमध्ये मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात नवजात शिशू कक्ष, महिला वार्ड आहे. मात्र शिशू व महिला वाॅर्डात मोठी वर्दळ होत असल्याने कोविडचा धोका बालकांना होण्याची भीती व्यक्त होत आहे. इतकेच नव्हेतर महिला आणि शिशू कक्षात नेहमीच पुरुषचा विनामास्क वावर असल्याने शिशुना स्तनपान करताना स्तनदा माता संकोच करीत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या उपस्थितीतपर्यंत सर्व व्यवस्थित असते. पण, सायंकाळी पाच वाजतानंतर शिशू कक्षात मोठी गर्दी होते. त्यामुळे विषाणू संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. नुकतीच दोन दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाने उपजिल्हा रूग्णालयालची तपासणी केली असून या बाबीकडे गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
सुरक्षा रक्षक असतो नेहमीचा अनुपस्थित…येथील उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टर असेपर्यंत सर्वकाही व्यवस्थित असते. मात्र, सायंकाळच्या सुमारास रूग्णालयात होणारी गर्दी चिंतेचा विषय ठरत आहे. शिशू कक्षात पुरुषांची होणारी गर्दी चिंताजनक असून बालकांसह स्तनदा मातांना कोरोना विषाणू होण्याची शक्यता आहे. एकीकडे बालकांनाही आता कोरोनाने आपल्या कवेत घेतल्याचे चित्र असताना या वॉर्डातील सुरक्षा रक्षक मात्र, सायंकाळच्या सुमारास अनुपस्थित राहत असल्याचे दिसून आले.
दुसऱ्या लाटेत बालकांनाही घेतले कोरोनाने कवेतगतवर्षीपासून कोरोना महाभयंकर विषाणूने चांगलाच कहर घातला आहे. पहिल्या लाटेत बालकांना कोरोना होण्याच्या घटना पुढे आल्या नव्हत्या.पण, दुसरी लाट मात्र, नवजात शिशुंसह बालकांनाही आपल्या कवेत घेत असल्याची माहिती आहे. आतापर्यंत तब्बल दीड हजारावर बालकांना कोरोनाने आपल्या कवेत घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.