*संघदिप बुध्द विहारातर्फ बाबासाहेब आंबेडकर 130 वी जयंती साजरी*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- दि.14 एप्रिल 2021 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संघदीप बुद्ध विहार कोराडी ता.कामठी येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजी मंत्री चन्द्रशेखर बावनकुळें यांचे शुभहस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कोराडी ग्रामपंचायत चे सरपंच नरेंद्र धानोले, महादूला नगर पंचायतीचे नगराध्यक्ष राजेश रंगारी, ग्राम पंचायत सदस्य प्रतीक रंगारी. सदस्या सौ.रत्नमालाताई बारमाटे, विजय वाघमारे, विनोद रंगारी, पन्नालाल रंगारी, दिलीप वाघमारे, राजेश बारमाटे, सुगत सार्वजनिक वाचनालय विदयार्थी प्रतिनिधी धीरज बोरकर व शुभम भेंडे उपस्थित होते.