जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे जिल्हास्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावल्या बद्दल विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान

जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे जिल्हास्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावल्या बद्दल विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान

विद्यार्थी हाच खरा देशाचा आधारस्तंभ भाजपा अध्यक्ष तथा उपसरपंच- श्री नारायण हिवरकर यांचे प्रतिपादन

वार्ताहार -संतोष मडावी (कोरपना तालुका)

कोरपना तालुका हा आदिवासी दलित शोषित पीडित म्हणून ओळखला जातो आज दि 21: 9 :2019 रोज शनिवार ला ठीक दहा वाजता जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास परिषद चंद्रपूर येथे भाग घेऊन जिल्हास्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांना श्री नारायण हिवरकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष कोरपना तालुका तथा उपसरपंच कन्हाळगाव प्रमुख पाहुणे म्हणून श्री शुक्लासर मुख्याध्यापक कन्हाळगाव,श्री चौधरी सर प्रभारी मुख्याध्यापक,श्री जीवतोडे सर, श्री तेलंग सर,मडावी मॅडम,श्री गजभिये सर आदी मान्यवर उपस्थित होते उपसरपंच श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव ने जिल्हास्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविल्या बद्दल श्री शुक्ला सर मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले यापूर्वी सुद्धा शाळेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम झाले असून वृक्ष लागवड,दहावीचा निकाल 96 / टक्के,जिल्हा प हॉ मध्ये शिक्षण घेउन जाणारा विद्यार्थी अनेक मोठ्या हुद्यावर काम करत असुन शाळेची स्थिती समाधान कारक आहे याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांचे अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य श्री मनवर,सौ ताराबाई मेश्राम,सौ संद्याताई गेडाम इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी,नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री जीवतोडे सर यांनी केले तर आभार गजभिये सर यांनी मानले

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …