*सायबर पोलीसाची उत्तम कामगीरी* *श्रीकांत बेडेकर याचे 37, 998/- रूपये केले परत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाँ अशोक बागुल सह सायबर टिमचे चोहीकडून अभिनंदन*

*सायबर पोलीसाची उत्तम कामगीरी*

*श्रीकांत बेडेकर याचे 37, 998/- रूपये केले परत
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाँ अशोक बागुल सह सायबर टिमचे चोहीकडून अभिनंदन*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- सायबर पोलिस स्टेशन नागपूर शहर येथे श्रीकांत बेडेकर (30) लक्ष्मी नगर, आठ रस्ता चौक, नागपूर पोलीस स्टेशन बजाज नगर यांनी दिनांक 08.04 2021 रोजी तक्रार दिली की त्यांचे बँक ऑफ बडोदा बँक खाते क्रमांक 06040100017983 शाखा लक्ष्मीनगर नागपूर येथे असून सदर बँक खात्यातून 37,998 रुपये ऑनलाईन काढून घेतले. अशा तक्रारी वरून सायबर पोलिस स्टेशनचे अमलदार नापोशी तुषार तिडके यांनी पेटीएम यांना इमेल करून त्यांच्या सतत पाठपुरावा केला असता तक्रारदाराचे संपूर्ण रक्कम 37,998 रुपये त्यांच्या बँक खात्यात परत आणण्यात सायबर पोलीस स्टेशनला यश प्राप्त झाले आहे. आतापावेतो सायबर पोलिस स्टेशन तर्फ अनेक गुंतागुंतीच्या व संवेदनशील गंभीर गुन्ह्यात तपासणीअंती आंतरराष्ट्रीय गुन्हेगार उदाहरणात नायजेरियन टोळी इत्यादींना अटक करून गुन्हे उघडीस आणण्यात आले आहे. सर्व तक्रारदारास कायदेशीर मदत करून कांउसलींग सुद्धा करण्यात येते जेणेकरून यापुढे त्यांच्यासोबत इतरांसोबत सायबर क्राईम घडू नये. तक्रारीच्या स्वरूपाप्रमाणे उदाहरणात जॉब फ्राँड, ऑनलाईन फ्राँड, हँकीग एक्स्ट्रोशन, फेक प्रोफाइल, चिटींग व्हलगर पोस्ट, आयडेंटी थेप्ट, सायकोलॉजिकल ट्रिक्स, सायबर स्टाँपींग, सायबर बुंलीग, रोमास फ्राँड, सिम्पती फ्राँड, सायबर टेरोरीसम, क्रेडिट डेबिट कार्ड फ्राँड, व्हायरस अटँक अँन्ड कम्प्युटर अंड ईलेक्ट्रोनिक, सोशल मीडिया, फेसबूक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, डुबलीकेट अकाउंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत सर्व गुन्हे टाळण्यासाठी करावयाची उपायोजना तसेच सायबर लिटरसी सायबर सेफ्टी सायबर क्राईम म्हणजे काय सायबर क्राईम चे प्रकार व पद्धती इंटरनेटचा वापर गैर वापर सायबर क्राईम टाळण्यासाठी करावयाची उपाययोजना यावर आतापावेतो किमान शंभर वेबिनार केंद्र शासन, राज्य शासन अंतर्गत येणारे विविध खाते, एनजीओ, शाळा, कॉलेजेस, क्लब इत्यादीसाठी विविध सामाजिक संस्था इत्यादीसाठी डॉ अशोक बागुल यांनी वेबिनार घेऊन संबंधितांना ट्रेनिंग दिलेली आहे. आतापावेतो विविध गुन्ह्यातील बळी पडलेल्या लोकांना लाखो रुपये परत करण्यात आले आहे. अशी इतर सर्व आवश्यक काम सायबर पोलिस स्टेशन तर्फ करण्यात येतात सदरची कारवाई अमितेश कुमार पोलीस आयुक्त नागपूर, सुनील फुलारी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर, यांच्या आदेश नावे विवेक मासाळ पोलीस उपायुक्त आर्थिक सायबर गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ अशोक बागुल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलिस स्टेशन नागपूर शहर यांनी केलेली आहे. याकामी सायबर पोलिस स्टेशनचे विशाल माने सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रणिता लांजेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार तिडके यांनी या कामात मदत केलेली आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …