*कोव्हिड मुळे झालेल्या मृतक रुग्णांना तात्काळ १० लाखांची मदत करण्याची मागणी*
*भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचीटणीस चंन्द्रशेखर बावनकुळे यांचे राज्य सरकार ला निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कांन्द्री च्या जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात आॅक्सीजन नसल्यामुळे चौघांचा मृत्यु झाल्याची अत्यंत दुर्देवी घटनांवर भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचीटणीस चंन्द्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त करीत राज्य सरकार ला एक निवेदन देऊन कोव्हिड मुळे झालेल्या मृतक रुग्णांना तात्काळ १० लाखांची मदत करण्याची मागणी केली आहे .
कांन्द्री च्या जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात ४८ बेडचे कोव्हिड 19 केअर सेंटर सुरु केले असुन सेंटर चालविण्याकरिता लागणारे अतिआवश्यक सुविधा नियमानुसार तिथे उपलब्ध नसुन वैद्यकीय अधिकारी , परिचारिका , सहाय्यक व ४८ बेडच्या रुग्णांकरिता लागणारी अतिआवश्यक आॅक्सीजन ची व्यवस्था तिथे नसतांना कोव्हिड केअर सेंटर कश्याप्रकारे सुरु करण्यात आले असा प्रश्न उपस्थित झाल्याने तसेच प्रशासकीय अधिकार्यांनी जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात आॅक्सीजन सह कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध न केल्यामुळे मृतक १) अमित भारद्वाज २) किरण बोराडे , ३) कल्पना कडू , व ४)हुकुमचंद येरपुडे अश्या चौघांचा मृत्यु झाला आहे . या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषीयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच कोव्हिड मुळे झालेल्या मृतक रुग्णांना तात्काळ १० लाखांची मदत करण्यात यावी . अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचीटणीस चंन्द्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकार ला केली आहे .