*सावनेरकरांनो स्वतःच्या सुरक्षितेते करीता घरीच रहा, नाहीतर आम्हास कारवास बाध्य व्हावे लागेल* – ठाणेदार मारुती मुळूक
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावनेर चे थानेदार ऑन फिल्ड*
*विनाकरण फिरण्यरा लोकांवर , दुचाकी, चारचाकी वाहनांवर कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरू…*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरासिया
सावनेर – सावनेरचे ठानेदार मारुती मुळूक यांनी सकाळी 9 वाजता आपले आधिनस्थ अधिकारी कर्मचारी व नगर परिषदेचे कर्मचारी आदींना सोबत घेऊन गांधी चौक,खापा चौक,गडकरी चौक,बाजार चौक ,होळी चौक इतर मार्केट परिसरात संयुक्तिक दौरा केला.
*नव्याने लागु करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’ व कड़क संचारबंदीचा अर्थ नागरिकांनी अत्यावश्यक कामा शिवाय घरातून बाहेर पडू नये, असा आहे. परंतु दुर्देवाने अनेक दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहने रस्त्यांवर दिसून येत आहे. नागरिक घराबाहेर दिसून येत आहे.*
*वाढत्या कोरोनावर नियंत्रणासाठी नागरिकांनी घरातच राहणे अपेक्षित आहे. त्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला . मात्र दुर्देवाने अजूनही नागरिक घराबाहेर दिसून येत आहे. नागरिकांनी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी व आरोग्यासाठी घरात राहून सहकार्य करावे अन्यथा नागरिकांना सक्तीने घरात डांबून ठेवावे लागेल, असा इशारा सावनेर चे थानेदार यांनी दिला.*
*यापूर्वीही नागरिकांना घरातून बाहेर पडू नये, अशी वारंवार विनंती केली. त्याबाबत गांभीर्य न दाखविल्याने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा काल रात्रि पासून लागू करण्यात आला. मात्र नागरिक रस्त्यांवर फिरत असल्याने कोरोनाचे गांभीर्य त्यांनी लक्षात घेतल्याचे दिसत नाही, अशी खंत पोलीस निरीक्षक यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षणासाठी या सर्व उपाययोजना केल्या आहेत.*
*सुरक्षेसाठी नियम पाळण्याची गरज आहे. परंतु नागरिक ऐकत नसतील तर सक्तीने त्यांना घरात कोंडावे लागेल, असे पो.नी.मुळुक म्हणाले.*
*पुढचे आदेश पर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. परिस्थिती नियंत्रणात असली तरी ती कायम राहण्याची गरज असून यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घरातच राहावे, असेही ते म्हणाले.*
*तर नागरिकांवर कारवाई*
*नागरिक बाहेर पडत आहे, हे योग्य नाही. त्यामुळे नाकाबंदी करण्याचे संकेत त्यांनी दिले* *नागरिक बाहेर दिसल्यास पोलिसांकडून त्यांना विचारणा केली जाईल. एवढेच नव्हे तर जमावबंदी कायद्यानुसार कारवाई करण्याचीही तयार असल्याचे ते म्हणाले.*