*महाविद्यालयात खुल्या निवडणुका नकोतच!*
*डॉ. भाऊराव डोळस वादविवाद स्पर्धेतील सूर*
तालुका वार्ताहर/कुही।दि.२१/०९/२१०९
कुही *नेतृत्वविकासासाठी महाविद्यालयात अनेक उपक्रम राबविले जातात त्यामुळे केवळ निवडणुकांमुळे विद्यार्थी नेतृत्व घडत नाही. उलट लोकशाही संवर्धनाच्या नावाखाली राजकीय पक्षांचा हस्तक्षेप, गोंधळ, गदारोळ, गुन्हेगारी यासारख्या अपप्रवृतींचा शिरकाव निवडणुकांमुळे महाविद्यालयात होतो. त्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणुका नकोतच, असा सूर मांढळ येथील वादविवाद स्पर्धेतून उमटला.*
*श्री लेमदेव पाटील महाविद्यालय मांढळ येथे नुकतीच डॉ.भाऊराव डोळस वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचा विषय ‘महाविद्यालयीन निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्त्वगुणांचा विकास होतो’ असा होता. सांस्कृतिक समिती व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रदीप रणदिवे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भाऊराव डोळस उपस्थित होते.*
*या स्पर्धेत एकूण ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बी.एस्सी भाग तीनची विद्यार्थीनी साधना गौरे हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. बी. ए . भाग दोनचा सौरभ आंबोने याला द्वितीय तर बी. एएस्सी भाग एक चा अंकित धनजोडे याला तृतीय पारितोषिक मिळाले.*
*महाविद्यालयात खुल्या पद्धतीने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका झाल्या तरी त्या पारदर्शक वातावरणात व्हाव्यात, त्यात लकोणत्याही प्रकारचा राजकीय व धार्मिक हस्तक्षेप नसेल तरच नेतृत्व गुणांचा व क्षमतांचा विकास होऊ शकतो, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रदीप रणदिवे यांनी व्यक्त केले.*
*प्रा. पंकज मेश्राम व कु.आशना कुरेशी यांनी संचालन केले. प्रास्ताविक डॉ. तीर्थराज कापगते तर आभार डॉ. नरेश जाधव यांनी मानले. या स्पर्धेत डॉ. दीपक तईकर, प्रा. सुनील अलोणे व प्रा. प्रकाश कटमुसरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर डॉ. स्मिता खरकाळे टाईम किपर होत्या. या वादविवाद स्पर्धेला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.*