*शासनाच्या नियमाचे पालन करा*
*पोलीस निरिक्षक गिरासे यांचे लोकांना आवहान*
नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेड – कोरोना च्या वाढता आकडा हा संपूर्ण महाराष्ट्र साठी चिंतेच्या विषय झाला आहेत.पण चिंता न करता काटेकोर शासनाचे नियमाचे पालन करने व योग्य आरोग्य ची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहेत.
मोवाड शहरात पोलिसांना कडून पायदळ पेट्रोलिंग करून लॉकडाऊन तसेच संचारबंदी बाबत सर्व नागरिकांना सुचित करण्यात आले. त्याच प्रमाणे भाजीपाला व फळ विक्रेते यांनासुद्धा सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे बाबत सांगितले. काल रात्री ८ वाजता पासून महाराष्ट्र राज्यात संचारबंदी सुरु झाली. या संचारबदीच्या काळात शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करवे . गरज असल्यास घराबाहेर पडावे. अन्यथा घराबाहेर पडू नये . सर्वांनी मास्कचा वापर करावा .
आपण नियमाचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. शहरातील जिवनावश्यक वस्तु , मेडीकल , दवाखान्यात सोशल डिटेसिंग चे पालन करावे. जेने करून कोरोनाचा फैलाव होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आदेश दिले.