*कन्हान शहरात कोरोना चा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता स्थानिक प्रशासना द्वारे दंडात्मक कारवाई शुरु* *रस्त्यावर उतरुन विना कारण घरा बाहेर फिरनार्यांवर व टेस्टींग न करणार्या व्यापारी दुकानदारांन वर केली दंडात्मक कारवाई* *सर्व व्यापारी दुकानदारांनी आर.टी.पी.सी आर टेस्ट करुन घ्यावे – नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व परि.पो.उप.कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांचे आव्हाहन*

*कन्हान शहरात कोरोना चा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता स्थानिक प्रशासना द्वारे दंडात्मक कारवाई शुरु*

*रस्त्यावर उतरुन विना कारण घरा बाहेर फिरनार्यांवर व टेस्टींग न करणार्या व्यापारी दुकानदारांन वर केली दंडात्मक कारवाई*

*सर्व व्यापारी दुकानदारांनी आर.टी.पी.सी आर टेस्ट करुन घ्यावे – नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व परि.पो.उप.कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांचे आव्हाहन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासना द्वारे राज्य शासनाच्या नियमाचे पालन करण्याचे कडकडीचे आव्हाहन केल्यावर ही शहरात राज्य शासनाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे नगर परिषद प्रशासनाने व कन्हान पोलीस प्रशासनाने राज्य शाशनाच्या नियमाचे उल्लंघन करणार्यांवर , विना कारण घरा बाहेर फिरनार्यांवर व टेस्टिंग न करणार्यां व्यापारी दुकानदारांन वर दंडात्मक कारवाई करुन सर्व व्यापारी दुकानदारांनी आर.टी.पी.सी आर टेस्ट करुन निगेटीव्ह रिपोर्ट आपल्या दुकानात ठेवावे असे कडकडीचे आव्हाहन नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांनी केले आहे .


महाराष्ट्र राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने नियमावली कठोर केली असुन गर्दी टाळण्याकरिता राज्यात कलम १४४ लागु केले असुन जीवनावश्यक वस्तुची दुकाने वगळता बाकी सर्व दुकानें बंद करण्याचे आव्हान शासनाने केले असुन कन्हान शहरात राज्य शासनाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता स्थानिक प्रशासना द्वारे दंडात्मक कारवाई सुरु केली असुन गुरुवार दिनांक १५ एप्रिल ला कन्हान शहारात विना कारण घरा बाहेर फिरनार्यांवर , मास्क चा वापर न करणार्यांवर , टेस्टिंग न करणार्यां व्यापारी दुकानदारांन वर नगर परिषद प्रशासनाने व कन्हान पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली असुन कोरोनाची साकळी तोडण्याकरिता सर्व मेडिकल स्टोर्स , किराणा , भाजीपाला , फळ विक्रेता , हाॅटेल दुकानदार सह सर्व व्यापारी दुकानदारांनी आर टी पी सी आर टेस्ट करुन निगेटीव्ह रिपोर्ट आपल्या दुकानात ठेवावे तसेच भाजीपाला दुकानदारांनी १५ फुट चे अंतर ठेवुन दुकान लावावे . कन्हान शहरातल्या बाजार पेठेत राज्य शासनाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोनाची साकळी तोडण्याकरिता ही दंडात्मक कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले असुन सर्व कन्हान शहराच्या नागरिकांनी , व्यापारी दुकानदारांनी , मास्क , सेनिटाइजर , सोशल डिस्टेंन्स चे पालन करावे , व विना कारण घरा बाहेर पडणे टाळावे , सर्व व्यापारांनी व नागरिकांनी आर टी पीसीआर टेस्ट करुन घ्यावे , गर्दीत जाणे टाळावे ,व राज्य शासनाच्या नियमाचे काठेकोरपणे पालन करुन कोरोनाची साकळी तोडण्याकरिता सहकार्य करावे .
असे कडकडीचे आव्हाहन नगर परिषद चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांनी केले आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …