*सावनेर पालिकेद्वारे ग्रामिण रूग्णालयास किटसह 10 आॅक्सिजन सिलेंडर*
*कोव्हीड रूग्णांसाठी नगर पलिकेचे महत्वपूर्ण योगदान ; पालिकेचे सर्वत्र कौतुक*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर: आरोग्य यंत्रणेला महत्वापूर्ण साहीत्याची पुर्तता करणे हे संमंधीत विभागाचे कार्य असते त्यासाठी षासनाने पुर्वीपासूनच नियोजन व आखणी केलेली असते. परंतू सावनेर ग्रामिण आरोग्य केंद्रात वाढत्या प्राणवायुच्या मागणीमुळे सावनेर नगर पालिकेच्या अध्यक्षा सौ.रेखाताई मोवाडे व उपाध्यक्ष अॅड. अरविंद लोधी यांनी पालिके तर्फे नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी संपूर्ण किटसह 10 आॅक्सीजन सिलेंडर भेंट देण्यात आले. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तालुक्यात वाढत्या कोरानाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वत्र नागरीक आपला प्राण वाचविण्याकरीता आरोग्य सेवेकडे आषेने बघत आहे. परंतू दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रूग्णांमुळे खाजगी तसेच षासकिय रूग्णालयात बेड सह प्राणवायुचा तुडवडा भासत आहे. त्यामुळे तालुक्यातील रूगणांना तालुक्यातच आरोग्य सेवा मिळावी व रूगण बरे व्हावे यासाठी सावनेर औद्योगिक प्रषिक्षण केंद्र येथे षासकिय कोव्हीड सेंटर उघडण्यात आले. या ठिकाणी प्रपाठक डाॅ.पवन मेश्राम यांच्या मार्गदर्षनात डाॅ. संदीप गुजर, डाॅ.हरिश बरैया हे आपल्या युनिट मधी डाॅक्टर मार्फत गंभीर झालेल्या कोव्हीड रूग्णांना भर्ती करून तातडीने आरोग्य सेवा पुरवीत आहे. तसेच वेळ प्रसंगी अति गंभीर रूग्णांना नागपूर वैद्यकिय महा विद्यालयात हलविण्याची वेवस्था करण्यात आली आहे. अष्यात सावनेर ग्रामिण रूग्णालयात असलेल्या पूर्वीचे सहा व आता पालिकेद्वारे प्रदान करण्यात आलेले 10 सिलेंडर मिळून एकुण 16 आॅक्सिजन सिलेंडर झाले आहे. यावेळी पालिकेद्वार नगराध्यक्ष सौ.रेखा मोवाडे व उपाध्यक्ष अॅड. अरविंद लोधी यांच्या हस्ते सिलेंडर प्रदान करतांना प्रपाठक डाॅ.पवन मेश्राम, डाॅ. संदीप गुजर, डाॅ. हरिश बरैया, डाॅ.ईषरत मॅडम, डाॅ.राम वरठी, सिस्टर तुपे, कर्मचारी घनष्याम तुर्के, संतोश बंडावार, षैलेष वाहाने, गणेष चांदेकर, तसेच न.प. विद्युत अभियंता अमोल कांबळे यांची उपस्थिती होती.