*घरगुती सिलेंडर मधुन आॅटोमध्ये गॅस भरुन देणार्या आरोपीला शांतीनगर पोलीसांनी पकड़ले* *आरोपी जवळुन थ्री व्हिलर सवारी आॅटो , घरगुती गॅस सिलेंडर , व एक मोटार पंप मशीन असा एकुण ८३,००० रुपयाचा मुद्देमाल केला जप्त*

*घरगुती सिलेंडर मधुन आॅटोमध्ये गॅस भरुन देणार्या आरोपीला शांतीनगर पोलीसांनी पकड़ले*

*आरोपी जवळुन थ्री व्हिलर सवारी आॅटो , घरगुती गॅस सिलेंडर , व एक मोटार पंप मशीन असा एकुण ८३,००० रुपयाचा मुद्देमाल केला जप्त*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

नागपुर – आपल्या घरगुती सिलेंडर मधुन आॅटोमध्ये गॅस भरुन देणार्या आरोपीला शांतीनगर पोलीसांनी सापडा रचुन पकड़ले असता त्याचा जवळुन थ्री व्हिलर सवारी आॅटो , घरगुती गॅस सिलेंडर , व एक मोटार पंप मशीन असा एकुण ८३,००० रुपयाचा मुद्देमाल केला जप्त करुन ही कारवाई करण्यात आली आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक १३ एप्रिल ला दुपारी ०१:३५ वाजता च्या सुमारास नागपुर शांतीनगर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अरुण बकाल यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की यातील आरोपी शेख वसीम शेख हनीफ वय ३५ वर्ष राहणार प्लाॅट नंबर १६ मस्के ले आऊट कावरापेठ शांतीनगर नागपुर हा घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधुन मोटार पंप द्वारे आॅटोमध्ये गॅस भरुन देण्याचे अवैध काम करीत अशा गुप्त माहिती वरून पोलीस निरीक्षक जी.जे. जामदार यांचा मार्गदर्शनाखाली कारवाई केली असता आरोपी आपले राहते घराचे कंपाउडमध्ये घरगुती वापराचे एक एच. पी. कंपनीचे गॅस सिलेंडर मधुन तीन चाकी सवारी ऑटो क्र. एम .एच. 40/2463 चा उजव्या बाजुस ऑटोला लागलेले गॅस सिलेंडरला असलेल्या काॅकला पाईप जोडुन मोटर पंप मशिन ला ईलेक्टिक वायरने सप्लाय घेवुन गॅस भरत असतांना दिसुन आला त्यावेळी आरोपी पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यास स्टाॅपचा मदतीने पकडले व त्याचा कडून तीन चाकी ऑटो क्र.एम. एच. 40-2463 किंमत 80,000/- रूपये, एक एच. पी. कंपनीचा घरगुती वापराचा गॅस सिलेंडर किंमत 1000/-रुपये, व एक मोटर पंप किंमत 2000/-रूपये असा एकूण 83000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला ज्वालाग्राही पदार्थ आहे असे माहीती असताना सुध्दा मानवी जीवन धोक्यात येईल अशी कृती असतांना काळाबाजार करताना मिळुन आल्याने शांतीनगर पोलीसांनी आरोपी विरुद्ध कलम 285 भादवी सह कलम 3 , 7 अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 प्रमाणे गुन्हा दाखल केला .सदर कारवाई पोलिस उपआयुक्त लोहीत मतानी, सहाय्यक पोलीस आयुक्त भुषन पंडीत लगडगंज विभाग नागपुर यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि जी जे जामदार, पोलीस उपनिरीक्षक अरूण बकाल, पोहवा राजेश चंदेल, पोशि जितेश रेड्डी, पोशि राहुल, कनोजिया यांनी ही कारवाई केली आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …